IPL 2023, RCB vs MI Highlights Update : चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला विजयी सलामी दिली. आरसीबीने १६. २ षटकात २ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला.

आरसीबीसाठी विराट कोहलीने ४९ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये विराटने ६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तसंच कर्णधार फाफ डु प्लेसिसनेही आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. फाफने ५ चौकार आणि ६ षटकार मारले. दिनेश कार्तिकला भोपळाही फोडला आला नाही. तर ग्लेन मॅक्सवेलने ३ चेंडूत १२ धावांची खेळी साकारली. मुंबईचे गोलंदाज कॅमेरुन ग्रीन आणि अर्शद खानला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.

Live Updates

Royal Challengers Banglore vs Mumbai Indians Highlights , IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि मुंबई इंडियन्स लाइव्ह अपडेट्स

23:07 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: विराट-फाफच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळं आरसीबीचा मुंबईवर दणदणीत विजय

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने दमदार अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीला विजयी सलामी दिली. आरसीबीने १६. २ षटकात २ विकेट्स गमावत १७२ धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा पराभव झाला.

22:48 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: विराट-फाफच्या आक्रमक फलंदाजीमुळं मुंबईच्या गोलंदाजांचं टेन्शन वाढलं, RCB विजयाच्या शिखरावर

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १७२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले आरसीबीचे फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस आक्रमक खेळी करत आहेत. दोन्ही फलंदाजांनी वादळी अर्धशतक ठोकलं आहे. सुरुवातीपासूनच दोघांनी धावांचा पाऊस पाडला असून मुंबई इंडियन्स पराभवाच्या छायेत आली आहे. 15 षटकानंतर आरसीबी १६१-२ अशा धावसंख्येवर पोहोचली आहे.

22:15 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: विराट-फाफची अर्धशतकी खेळी, मुंबईच्या गोलंदाजांचा उडवला धुव्वा, RCB, १३१-०

मुंबई इंडियन्सने दिलेल्या १७२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले आरसीबीचे फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस आक्रमक खेळी करत आहेत. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत पॉवर प्लेमध्येच आरसीबीने पन्नाशी गाठली. त्यानंतरही विराट आणि फाफने आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. त्यामुळे ९ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या ८०-० झाली होती.

https://twitter.com/IPL/status/1642571012310204417?s=20

21:56 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: आरसीबीचे सलामीवर विराट कोहली-फाफ डु प्लेसिस मैदानात, RCB, ५४-०

मुंबई इंडियन्सने दिलेलं १७२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आरसीबीचे सलामीवर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस मैदानात उतरले आहेत. दोन्ही फलंदाज सावध खेळी करत असल्याने ३ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या ३४-० झाली होती.

https://twitter.com/IPL/status/1642564793495109632?s=20

21:39 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माची चौफेर फटकेबाजी, आरसीबीला १७२ धावांचं लक्ष्य

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1642558576676999168?s=20

21:37 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI, IPL 2023 Live: मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माची चौफेर फटकेबाजी, आरसीबीला १७२ धावांचं लक्ष्य

चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगतदार सामना सुरु आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची आऱसीबीच्या गोलंदाजांनी दाणदाण केली. इशान किशन, कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर वधेराने २१ धावांची खेळी केली. मात्र, टिम डेविड, ऋतिक शौकीनला धावांचा सूर गवसला नाही. मुंबईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर तिलक वर्माने मुंबईचा डाव सावरत आक्रमक खेळी केली. तिलक वर्माच्या अर्धशतकी खेळीमुळं मुंबई इंडियन्सने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे आरसीबीला विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. तिलक वर्माने ४६ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ८४ धावांची नाबाद खेळी केली.

https://twitter.com/IPL/status/1642558576676999168?s=20

21:08 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI Live Score : मुंबईची फलंदाजी गडगडली पण तिलक वर्माने डाव सावरला, मुंबई १४९-७

आरसीबीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या सहा फलंदाजांना तंबूत पुाठवलं. पण एकट्या तिलक वर्माने सावध खेळी करत मुंबईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. तिलक वर्माने अर्धशतक ठोकलं असून १७ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १२३-७ अशी झाली होती.

https://twitter.com/IPL/status/1642551028112572417?s=20

20:33 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI Live Score : RCB च्या गोलंदाजांची कमाल, मुंबई इंडियन्सचे सहा फलंदाज बाद, मुंबई १११-६

मुंबई इंडियन्सची खराब सुरुवात झाली आहे. सलामीवर फलंदाज इशान किशन,कॅमरुन ग्रीन, कर्णधार रोहित शर्मा स्वस्ता माघारी परतले आहेत. त्यानंतर सू्र्यकुमार यादवनने सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही ब्रेसवेलने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे मुंबईचे चार महत्वाचे फलंदाज बाद झाल्याने धावसंख्या मंदावली आहे. आरसीबीचे गोलंदाज भेदक मारा करताना दिसत आहेत. मुंबईचा तिलक वर्मा चौफेर फटकेबाजी करत आहे. त्यामुळे १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ७८-४ झाली. त्यानंतर कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर वधेरा २१ धावांवर बाद झाला.

https://twitter.com/IPL/status/1642535739278913543?s=20

20:02 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI Live Score : मुंबईला चौथा धक्का, रोहित शर्मानंतर सूर्यकुमारही झाला बाद, मुंबई, ५५-४

मुंबई इंडियन्सची सलामी जोडी रोहित-इशान फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने पॉवर प्ले मधील पहिलं षटक फेकलं. पहिल्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २ धावांवर पोहोचली. रिस टॉपलेच्या दुसऱ्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११-० अशी झाली होती. मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मुंबईचा सलामीवीर फलंदाज इशान किशन १० धावांवर बाद झाल्याने मुंबईला पहिला धक्का बसला. त्यानंतर कॅमरुन ग्रीन ५ धावांवर रीस टॉपलेच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर सिराजच्या उसळत्या चेंडूवर रोहित शर्माचा झेल उडाला होता. पण सिराज आणि कार्तिकमध्ये झेल घेताना गोंधळ उडाला आणि रोहितला एका धावेवर असताना जीवदान मिळालं होतं. पण दीपच्या पुढच्या षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला,

19:45 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का, इशान-ग्रीन स्वस्तात माघारी, मुंबई, १९-२

मुंबई इंडियन्सची सलामी जोडी रोहित-इशान फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने पॉवर प्ले मधील पहिलं षटक फेकलं. पहिल्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २ धावांवर पोहोचली. रिस टॉपलेच्या दुसऱ्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११-० अशी झाली होती. मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर मुंबईचा सलामीवीर फलंदाज इशान किशन १० धावांवर बाद झाल्याने मुंबईला पहिला धक्का बसला. त्यानंतर कॅमरुन ग्रीन ५ धावांवर रीस टॉपलेच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला.

https://twitter.com/IPL/status/1642532157380784130?s=20

19:35 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI Live Update : रोहित शर्मा-इशान किशन फलंदाजीसाठी उतरले मैदानात, मुंबई, ११-०

मुंबई इंडियन्सची सलामी जोडी रोहित-इशान फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने पॉवर प्ले मधील पहिलं षटक फेकलं. पहिल्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद २ धावांवर पोहोचली आहे.रिस टॉपलेच्या दुसऱ्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११-० अशी झालीय.

https://twitter.com/IPL/status/1642523995475177472?s=20

19:06 (IST) 2 Apr 2023
RCB ने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, रोहितच्या पलटणची फलंदाजी

मुंबई इ़ंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात थोड्याच वेळात चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रंगतदार सामना होणार आहे. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्सची पलटणला थोड्याच वेळात फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1642508110467325952?s=20

17:38 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI : 'अशी' असेल दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग XI

सामना- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, आयपीएल २०२३, पाचवा सामना

दिवस – २ एप्रिल (रविवार), सायंकाळी ७ वाजता

ठिकाण – एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु

वाचा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग ११

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, महिपाल लोमरोर, मायकल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज़ अहमद, डेविड विली, आकाश दीप, सिराज, रीस टॉपले

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अरशद खान, जेसन बेहरेनडॉर्फ

17:35 (IST) 2 Apr 2023
RCB vs MI : सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये जोरदार लढत

आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई इंडियन्सची पटलण यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठी सज्ज झाली आहे. ३१ मार्चपासून आयपीएलचे सामने रंगतदार होत असून तमाम क्रिकेटप्रेमींची आजचा सामना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई इंडियन्स विरोधात झालेल्या मागील पाच सामन्यांपैकी सलग दोन सामन्यांमध्ये बंगळुरुने बाजी मारली आहे. त्यामुळे बंगळुरु आजच्या सामन्यात विजयाची हॅट्रिक मारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सवर पराभवाचं सावट पसरलं होतं. परंतु, यंदाच्या आयपीएलमध्ये बंगळुरुचा पराभव करून मुंबईला विजयाची दिशा मिळते का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करत असून फाफ डु प्लेसिस आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. थोड्याच वेळात नाणेफेक होणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1642429499366338560?s=20

IPL 2023 RCB vs MI Live Match Updates

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि मुंबई इंडियन्स लाइव्ह अपडेट्स

चेन्नईत बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी सलामी दिली.

Story img Loader