IPL 2023, RR vs Match Update: आयपीएलचा १००० वा सामना रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला . या सामन्यात मुंबईने राजस्थानवर ६ गडी राखून शानदार विजय मिळवला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा करताना यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर ७ बाद २१२ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने १९.३ षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीम डेव्हिडच्या बॅटमधून आला विजयी षटकार –

प्रत्युत्तरादाखल फलंदाजीला आलेल्या मुंबईने ३ चेंडू आणि ६ गडी राखून लक्ष्य गाठले. संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत राहिली. तो ३ धावांवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. इशान किशनलाही मोठी खेळी करता आली नाही. तो २८ धावा करून बाद झाला. यानंतर कॅमेरून ग्रीनने शानदार खेळी खेळली, मात्र त्याचे अर्धशतक हुकले. कॅमेरून ग्रीन ४४ धावांवर बाद झाला. सूर्याची बॅट जोरात तळपली. त्याने २९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ५५ धावा केल्या आणि संघाला विजयाच्या जवळ नेले.

यानंतर टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा यांनी शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २९ धावा केल्या, तर टीम डेव्हिडने १४ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्या. टीम डेव्हिडने शेवटच्या षटकात सलग तीन षटकार लगावत मुंबईला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून आर आश्विनने दोन विकेट घेतल्या. त्याचबरोबर बोल्ट आणि संदीपने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

हेही वाचा – मुंबई इंडियन्सला विजयासाठी १७ धावांची गरज असताना टीम डेव्हिडनं मारली षटकार हॅट्रिक, पाहा शेवटच्या षटकातील Video

यशस्वीने शतक झळकावले –

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या राजस्थानने चांगली सुरुवात केली. संघाने २० षटकांत ७ गडी गमावून २१२ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांच्यात चांगली भागीदारी. यशस्वी जैस्वालने शतक झळकावले. यासह चालू मोसमात शतक ठोकणारा तो तिसरा फलंदाज ठरला. यशस्वीने ६२ चेंडूत १६ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १२४ धावा केल्या. जोस बटलर १८ धावांवर बाद झाला. कर्णधार संजू सॅमसनलाही मोठी खेळी खेळता आली नाही. तो १४ धावा काढून बाद झाला.

यानंतर देवदत्त पडिक्कललाही मोठी खेळी करता आली नाही. तो केवळ दोन धावा काढून बाद झाला. जेसन होल्डरलाही मोठी खेळी करता आली नाही. होल्डर एका षटकाराच्या मदतीने ११ धावा करून बाद झाला. शिमरॉन हेटमायरलाही मैदानावर फार काळ तग धरता आला नाही. तो केवळ ८ धावा करून बाद झाला. ध्रुव जुरेललाही कमाल दाखवता आली नाही. तो अवघ्या २ धावांवर बाद झाला. मुंबईच्या अर्शद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले.