Rajasthan Royals vs Punjab Kings Score Updates:आयपीएलच्या १६व्या हंगामातील आठवा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतला. तसेच पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नाबाद ८६ (५६) धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी ४ बाद १९७ धावा केल्या. त्याचबरोबर राजस्थानला १९८ धावांचे लक्ष्य दिले आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबला कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांनी शानदार सुरुवात करुन दिली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करताना पहिल्या गड्यासाठी ९० धावांची दमदार भागीदारी केली. त्यानंतर प्रभसिमरन सिंग बाद झाला. त्याने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या.
दुसऱ्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी –
त्यानंतर शिखर धवन आणि जितेश शर्माने संघाचा डाव पुढे नेण्याचे काम केले. धवन आणि जितेश आक्रमक फलंदाजी सुरु ठेवताना दुसऱ्या गड्यासाठी ६७ धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये जितेश शर्माने २७ धावांची योगदान दिले. त्याने १६ चेंडूचा सामना करताना २ चौकार आणि १ षटकार लगावला. त्यानंतर आलेला सिकंदर रझा मात्र फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. तो फक्त एक धाव काढून बाद झाला. तसेच शाहरुख खान देखील ११ धावांचे योगदान देऊन बाद झाला.
जेसन होल्डरने घेतल्या सर्वाधिक विकेट्स –
राजस्थान रॉयल्स संघाकडून गोलंदाजी करताना जेसन होल्डरने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या ४ षटकांत २९ धावा देताना दोन विकेट्स घेतल्या. तसेच आर आश्विने ४ षटकांत २५ धावा देताना एक विकेट घेतली. त्याचबरोबर युजवेंद्र चहलनेही ५० धावा देताना एक विकेट घेतली.
दोन्ही संघांची प्लेइंग-11
पंजाब किंग्ज: शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करण, सिकंदर रझा, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
सब्सीट्यूट खेळाडू: अथर्व तायडे, हरप्रीत भाटिया, मॅथ्यू शॉर्ट, मोहित राठी आणि ऋषी धवन.
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युजवेंद्र चहल.
सब्सीट्यूट खेळाडू: आकाश वशिष्ठ, मुरुगन अश्विन, कुलदीप यादव आणि डोनोवन फरेरा.