Rohit Sharma politician: भारतात सध्या क्रिकेट आयपीएलचे वारे खूप जोरात सुरु आहे. त्यात मागील पाच ते सहा दिवसात अनके चुरशीचे सामने होत असून क्रिकेट रसिकांसाठी ही एक पर्वणीच झाली आहे. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय टीम म्हणली की, ती म्हणजे मुंबई इंडियन्स! तब्बल पाचवेळा विजेचेपद पटकावणारी टीम मुंबई इंडियन्स अनेक चाहते आहे. पहिल्या दोन सामन्यांत हार पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर थरारक विजयाची नोंद केली. १६ एप्रिलला मुंबईचा पुढचा सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध घरच्या मैदानावर होणार आहे. पण, त्याआधी रोहित शर्माचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.
सध्या भारतात आयपीएलचा १६वा हंगाम खेळला जात असून दहा संघांमध्ये विजेतेपदाची लढाई सुरू आहे. टूर्नामेंटसोबतच खेळाडूंमध्ये खूप धमाल सुरु असते, अशा मजा-मस्तीच्या व्हिडिओची वाट चाहते सोशल मीडियावर उत्सुकतेने पाहत राहतात. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान मस्ती करताना दिसत आहे. त्यात तो राजकारणाच्या लुकमध्ये दिसत आहे.
माहितीसाठी, भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कमाईचा मोठा हिस्सा हा फक्त जाहिरातींमधून येतो. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा असे दिग्गज खेळाडू जाहिरातींच्या माध्यमातून दरवर्षी कोटींची कमाई करतात. गुरुवारी, उजव्या हाताच्या फलंदाजाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला जो जाहिरात शूटचा आहे. या व्हिडिओमध्ये रोहितची पत्नी रितिका सजदेह, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल देखील दिसत आहेत.
शूटिंगदरम्यान रोहित मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते आणि तो कुर्ता आणि पायजमा या नेत्यासारखा पोशाख घातला आहे, त्याच्या गळ्यात सोन्याच्या दोन साखळ्या आहेत आणि हातात अंगठ्या आहेत. रोहितचा हा लूक मूळ चित्रपटातील संजय दत्तच्या पात्रासारखा दिसतो. त्याच वेळी, श्रेयस अय्यर ड्रायव्हरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे आणि गिल रोहितचा पीए झाला आहे.
रोहितचा नवा राजकारणी लुक
या व्हिडीओत रोहित राजकारणीच्या रुपात दिसतोय आणि पत्नी रितिका सजदेह त्याच्यामागोमाग आनंदात दिसतेय… हा व्हिडीओ जाहीरातीचा असल्याचे स्पष्ट होतंय आणि यात रोहितसोहत शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर हेही दिसत आहेत. यापूर्वी तुम्ही आपल्या लाडक्या रोहित शर्माला साधा आणि सरळ-सज्जन अशा लूकमध्ये पाहिलं असेल. पत्नी रितीकाच्या भावाच्या लग्नात देखील रोहितने शेरवानी सारखे भरजरी कपडे घालते नव्हते. मात्र आता व्हायरल झालेल्या या लूकमध्ये रोहितच्या गळ्यात २ सोन्याच्या जाड चैन, गोफ, हातात सोन्याचं मोठ ब्रेसलेट दिसंतय. याशिवाय त्याने अगदी राजकारण्यांप्रमाणे कपडे घातलेले पहायला मिळतंय. दरम्यान या लूकनंतर रोहित शर्मा राजकारणात प्रवेश करतोय का, असा प्रश्न सर्व चाहत्यांना पडला आहे.