Virender Sehwag On Ricky Ponting: आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत सलग पाच सामने गमावले आहेत. या मोसमात संघाने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. आरसीबीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून संघाचा पाचवा सामना हरला. या पराभवानंतर माजी भारतीय खेळाडू वीरेंद्र सेहवागने दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यावर जोरदार टीका केली. त्याला जबाबदार धरले पाहिजे, असे सेहवाग म्हणाला. “या मोसमात ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत डेव्हिड वॉर्नर संघाचे नेतृत्व करत आहे.”

वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “जेव्हा दिल्लीचा संघ चांगली कामगिरी करत होता, तेव्हा आम्ही त्याचे श्रेय प्रशिक्षक रिकी पाँटिंगला देत होतो. त्याचबरोबर आता दिल्ली खराब कामगिरी करत असल्याने त्याची जबाबदारीही प्रशिक्षकाला घ्यावी लागणार आहे. दिल्लीकडून खेळलेला वीरेंद्र सेहवाग म्हणाला, मी यापूर्वीही म्हटले होते की, आयपीएलमध्ये प्रशिक्षक काहीही करत नाहीत. त्याची भूमिका शून्य आहे. ते फक्त व्यवस्थापनासाठी आहेत. तुम्हाला चांगला सराव करायला लावतो. खेळाडूंना आत्मविश्वास देतो.”

हेही वाचा: IPL 2023, GTvsRR Score: रजवाड्यांची रॉयल्स कामगिरी! राजस्थानचा गुजरातवर तीन गडी राखून सनसनाटी विजय

‘त्यांना जबाबदार धरले पाहिजे’- सेहवाग

क्रिकबझवर बोलताना सेहवाग म्हणाला, “मला वाटते की मी यापूर्वीही म्हटले होते की पंजाबने दिल्लीकडे कुऱ्हाड दिली आहे, त्यामुळे आता ती कुऱ्हाड दिल्लीच्या पायावरच घाव घालत आहे ती म्हणजे रिकी पाँटिंग. जेव्हा संघ जिंकतो तेव्हा प्रशिक्षकांना श्रेय दिले जाते, त्यामुळे जेव्हा संघ हरतो तेव्हा त्यांना जबाबदार धरले पाहिजे. पाँटिंगने फायनलमध्ये पोहोचून उत्कृष्ट कामगिरी केली आहे, असे आम्ही अनेकदा सांगितले असले, तरी ते जवळजवळ दरवर्षी प्लेऑफमध्ये पोहोचतात. ते सर्व श्रेय ते घेतात आता हे पराभवाची जबाबदारी देखील त्यांना घ्यावी लागेल.”

माजी भारतीय फलंदाज पुढे म्हणाला, “हा भारतीय संघ नाही जिथे ते विजयाचे श्रेय घेतात आणि पराभवासाठी दुसऱ्याला दोषी ठरवले जाते. आयपीएल संघात प्रशिक्षकाची भूमिका नसते. मॅनेजमेंट आणि खेळाडूंना आत्मविश्वास देण्याची मोठी जबाबदारी असते, पण शेवटी, प्रशिक्षक तेव्हाच चांगला दिसतो जेव्हा संघ चांगली कामगिरी करतो जी दिल्लीने अजिबात केली नाही. मला असे वाटते की दिल्ली अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे त्यांचे नशीब बदलण्यासाठी काय करावे याबद्दल ते गोंधळलेले आहेत.”

हेही वाचा: MI vs KKR: इशान-रोहितने live मुलाखतीत केला हस्तक्षेप अन् झहीर खानला खेचून नेले, पाहा Video

दिल्लीची आतापर्यंतची कामगिरी

आयपीएलमध्ये दिल्लीने आतापर्यंत खेळलेल्या सर्व ५ सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. संघाने लखनऊविरुद्धचा पहिला सामना ५० धावांनी, दुसरा सामना गुजरातविरुद्ध ६ विकेटने, तिसरा सामना राजस्थानविरुद्ध ५७ धावांनी, चौथा सामना मुंबईविरुद्ध ६ विकेटने आणि पाचवा सामना आरसीबीविरुद्ध २३ धावांनी गमावला.

Story img Loader