मुंबई इंडियन्स आयपीएल २०२३ मध्ये बाहेर पडणार होतीच पण शुबमन गिलने बंगळुरूमध्ये अशी काही खेळी केली त्यामुळे एममाय पलटणला नवसंजीवनी मिळाली आणि ते प्ले ऑफमध्ये पोहचले. २२ वर्षीय युवा सलामीवीराने गुजरात टायटन्ससाठी सलग दुसरे शतक झळकावले. त्याच्या शतकापुढे विराट कोहलीचे शतक झाकोळले गेले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली. समीकरण असे होते की बंगळुरूनेच जर हा सामना जिंकला असता तर ५ वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स बाहेर पडली असती.

बरं, जेव्हा शुबमन गिलने शतक ठोकून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आणि मुंबईला प्लेऑफचं तिकीट पक्कं झालं. यानंतर महान फलंदाज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने एका ट्विटमध्ये गिलचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले. त्याने लिहिले, “कॅमेरून ग्रीन आणि शुबमन गिल यांनी मुंबई इंडियन्ससाठी खूप फलंदाजी केली.” (येथे त्याने एक मजेदार इमोजी देखील टाकला).

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Yograj Singh coach of Arjun Tendulkar
Yograj Singh: अर्जुन तेंडुलकरनं योगराज सिंग याचं कोचिंग मध्येच का सोडलं? युवराज सिंगच्या वडिलांनी सांगितलं खरं कारण

सचिनने पुढे लिहिले, “विराट कोहलीने अप्रतिम फलंदाजी करताना सलग दुसरे शतक झळकावले. त्याची खेळी अप्रतिम होती. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचल्याचा आनंद आहे. एकाच दिवसात आयपीएलमध्ये तीन शतके झळकावली. प्रथम, कॅमेरून ग्रीनने हैदराबादविरुद्ध मुंबईसाठी शतक झळकावले आणि दुसरीकडे विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी बंगळुरू आणि गुजरात सामन्यात शतके ठोकली.”

हेही वाचा: IPL 2023: “बिर्याणी नाही…!” आयपीएलमध्ये पाच वेळा शून्यावर बाद होणारा जोस बटलरने स्वतः वरच अशी काही कमेंट केली की चाहतेही आश्चर्यचकित

दुसरीकडे, सचिन तेंडुलकरची ही पोस्ट आरसीबीच्या चाहत्यांना फारशी आवडलेली नाही. “मात्र, आता कोणी काय करू शकतो? ही भाग्याची गोष्ट आहे.” अशी पोस्ट सचिनने केली. एक षटकात सर्वाधिक धावा करणारा फाफ डु प्लेसिस आणि तिसरा सर्वोत्तम धावा करणारा विराट कोहली प्लेऑफमधून बाहेर पडला, रोहित शर्माचा संघ प्लेऑफमध्ये आहे आणि त्याने सहावे जेतेपद जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही.

विराटने गिलला मारली मिठी

गिलने अनेकदा सांगितले आहे की, तो विराट कोहली याला आदर्श मानतो. तसेच, दोघांमध्ये चांगले नाते आहे. हेच नाते त्यांचे सामन्यानंतरही पाहायला मिळाले. सामन्यानंतर आरसीबी प्ले-ऑफमधून बाहेर पडल्याचे दु:ख विसरत विराट कोहलीने शुबमन गिल याला त्याच्या शानदार शतकासाठी शुभेच्छा दिल्या. विराटने गिलला मिठी मारली आणि जबरदस्त खेळीचे कौतुकही केले.

हेही वाचा: Asia cup 2023: अखेर आशिया चषकासाठी भारत तयार, पण पाकिस्तानसमोर ठेवली मोठी अट; म्हणाले, “…हे आधी लिहून द्या”

पहिला क्वालिफायर सामना

आयपीएल २०२३ स्पर्धेतील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात खेळला जाणार आहे. हा सामना २३ मे रोजी एम.ए. चिदंबरम स्टेडिअमवर पार पडणार आहे.

Story img Loader