आयपीएल २०२३च्या ७ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज ऑनरिक नॉर्खिया याने गुजरात टायटन्सचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज शुबमन गिलला १४८.८ प्रति तासच्या वेगाने रॉकेट चेडू टाकत क्लीन बोल्ड केले. नॉर्खियाने पाचव्या षटकाचा पहिला चेंडू १४८.८ किमी /प्रति तास वेगाने टाकला, शॉर्ट लांबी, जो टप्पा नंतर वेगाने बाहेर आला, गिल पूर्णपणे चुकला आणि क्लीन बोल्ड झाला.
गिलने बाद होण्यापूर्वी १३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १४ धावा केल्या. नॉर्खियाने याआधी गिलप्रमाणेच तिसर्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुसरा सलामीवीर रिद्धिमान साहालाही बाद केले होते. साहाने ७ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. नॉर्खियाने साहाला ज्या चेंडूवर गोलंदाजी करून बाद केले त्याचा वेग ताशी १४३.५ किमी./प्रति तास इतका होता.
माहितीसाठी, लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनचा नॉर्खिया भाग नव्हता. नेदरलँड्सविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर नॉर्खिया भारतात आला. गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या गोलंदाजीचा प्रमुख भाग असलेल्या नॉर्खियाला आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात फ्रँचायझीने कायम ठेवले होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ गडी गमावून १६२ धावा केल्या. संघाकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अक्षर पटेलने २२ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची खेळी केली. तर सरफराज खानने ३० (३४) धावांचे योगदान दिले. गुजरातकडून मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले. त्याचवेळी अल्झारी जोसेफने २ बळी घेण्यात यश मिळविले. कालच्या सामन्यात दिल्लीने सरफराज खानऐवजी खलील अहमदला प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळवले. त्याचवेळी जोशुआ लिटलच्या जागी गुजरातने विजय शंकरला खेळवले.
१६३ या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात देखील फारशी चांगली नव्हती. गुजरातचे दोन्ही सलामीवीर वृद्धिमान साहा व शुबमन गिल यांच्यासह कर्णधार हार्दिक पांड्या पॉवर-प्ले मध्येच तंबूत परतला. संघ अडचणीत असताना तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक भागीदाऱ्या केलेले साई सुदर्शन व विजय शंकर हे संघाच्या मदतीला धावून आले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. विजय शंकर २९ धावा करत माघारी परतल्यानंतर, हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या डेव्हिड मिलरने आपला दर्जा दाखवला. त्याने फटकेबाजी करत संघाचा विजय जवळ आणला. दरम्यान सुदर्शनने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. अखेर या दोघांनी संघाचा विजय साकार केला.