IPL 2023, SRH vs RR Cricket Score Update: भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ स्पर्धेत आपल्या फिरकीची जादू दाखवत हैदराबादला धूळ चारली. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळत होते. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान होते त्यात राजस्थानने बाजी मारली.

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या चहलने आयपीएल २०२३ स्पर्धेचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला गेला.राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादवर तब्बल ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादसमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, हैदराबाद केवळ १३१ धावाच करू शकली.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

डोंगराएवढे मोठे असलेले आव्हान पार करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांनी शून्यावर दोन विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी भोपळाही न फोडता माघारी परतले. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात त्यांना बाद करून हैदराबादला दुहेरी धक्का दिला. यानंतर युझवेंद्र चहलने हॅरी ब्रूकला बाद करून हैदराबादला तिसरा धक्का दिला. ब्रूकने १३ धावा केल्या. यानंतर वॉशिंग्टन सुंदरही स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. अश्विनने ग्लेनला बाद केले, सलामीवीर मयांक अग्रवाल याने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला मात्र २३ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारला बाद करून चहलने सामन्यातील चौथी विकेट पूर्ण केली. यानंतर अब्दुल समद आणि उमरान मलिक यांनी काही मोठे फटके मारले. मात्र संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा: SRH vs RR: ओह्ह ओ! वेगाच्या बादशहाची दहशत कायम, उमरानचा १४९.३२ km/hrचा चेंडू अन् पडिक्कल क्लीन बोल्ड; Video व्हायरल

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांनी दणका दिला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी झाली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात जोस बटलर २२ चेंडूत ५४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर यशस्वी जैस्वालने कर्णधार संजू सॅमसनसोबत अर्धशतकी भागीदारी केली. यशस्वी ३७ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. यानंतर देवदत्त पडिक्कलला उमरान मलिकने क्लीन बोल्ड केले. रियान पराग ७ धावा करून बाद झाला. हेटमायर आणि अश्विन यांच्यात सहाव्या विकेटसाठी ९ चेंडूत १६ धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे राजस्थानच्या संघाला २०० चा टप्पा पार करता आला. हैदराबादकडून नटराजन आणि फारुखने प्रत्येकी दोन, तर उमरानला एक विकेट मिळाली.