भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL २०२३ वेळापत्रक) १६व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल ३१ मार्चपासून सुरू होणार आहे. आणि स्पर्धेचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. आयपीएलच्या आगामी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यात ३१ मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. यावेळी ५२ दिवसांच्या कालावधीत एकूण ७० लीग टप्प्यातील सामने १२ ठिकाणी खेळवले जातील.
टाटा आयपीएल २०२३ला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून ब्रॉडकास्टर डिस्ने स्टारच्या आकडेवारीवरून हे स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ४७% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. स्पर्धेच्या उदघाटनाच्या दिवशी १४० मिलियन दर्शकांनी थेट प्रक्षेपणाचा आनंद घेतला, यामध्ये उदघाटन समारोहाचा देखील समावेश होता. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या दरम्यानचा पहिला सामना १३० मिलियन दर्शकांनी पाहिला.
स्टार स्पोर्ट्सच्या वेगवगळ्या कार्यक्रमात सुपरस्टार विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा सहभाग आहे. सोशल मीडियावर या हे कार्यक्रम खूप लोकप्रिय झाले आहेत, चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला असून आपल्या आवडत्या संघासाठी ते चिअर करत आहेत. टाटा आयपीएल २०२३ मधील अनेक रोमांचक, उत्साहवर्धक क्षणांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मीडिया हक्क चार पॅकेजमध्ये विकले गेले
बीसीसीआयने चार पॅकेजमध्ये मीडिया हक्क विकले. बोर्डाला मीडिया हक्कांमधून एकूण 48,390 कोटी रुपये मिळाले. स्टार इंडियाने २३,७२५ कोटी रुपयांना टीव्हीचे हक्क विकत घेतले. त्याच वेळी, Viacom18 ने २३,७५८ कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळवले होते. वायाकॉमने पॅकेज-सी हे नाव देखील ठेवले आहे. यासाठी त्यांनी २९९१ कोटी रुपयांची बोली लावली. त्याच वेळी, टाइम्स इंटरनेटसह वायकॉमने १३२४ कोटींना पॅकेज-डी विकत घेतला.
पॅकेज-ए कडे भारतासाठी टीव्ही अधिकार आहेत आणि पॅकेज-बीकडे भारतासाठी डिजिटल अधिकार आहेत. पॅकेज-सीमध्ये निवडक १८ सामने (अनन्य) आणि पॅकेज-डीमध्ये परदेशी टीव्ही आणि डिजिटल अधिकारांचा समावेश आहे. रिलायन्सच्या मालकीची Viacom18, ज्याला पॅकेज-डी अधिकार मिळाले आहेत, ते ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि यूकेमध्ये सामने प्रसारित करणार आहेत. त्याच वेळी, टाइम्स इंटरनेट मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका तसेच अमेरिका आणि उर्वरित जगामध्ये सामन्यांचे प्रसारण करेल.