आयपीएल २०२३ स्पर्धेच्या ३४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघात आमना-सामना झाला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने सात धावांनी शानदार विजय मिळवला. तसेच, हंगामातील दुसरा विजय नावावर केला. हा सामना जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने संघसहकाऱ्यांची प्रशंसा केली. सध्या याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.

दिल्लीला आता सातत्याने सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल – मोहम्मद कैफ

आयपीएलच्या या मोसमात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. हैदराबाद २ विजय आणि ४ गुणांसह गुणतालिकेत नवव्या तर दिल्ली कॅपिटल्स कालच्या विजयासह दहाव्या स्थानावर आहे. गुणतालिकेत मजबूत होण्यासाठी संघासाठी आगामी प्रत्येक सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. मोहम्मद कैफने सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सला इशारा दिला होता की दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या रणनीतीवर काम करणे आवश्यक आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “दिल्लीला त्यांच्या संघ संयोजनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. या संघाला त्यांच्या रणनीतींवर नव्याने विचार करण्याची गरज आहे. संघात अनेक समस्या असून, खेळाडूंचे मनोधैर्यही थोडे कमी झाल्याचे दिसते. आता दिल्ली कॅपिटल्सला सर्वकाही विसरून सातत्याने सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, जे अशक्य काम नाही.”

हेही वाचा: Virat and Anushka: अनुष्का बनली पार्टनर अन् विराट झाला बॅडमिंटन चॅम्पियन!  आयपीएलदरम्यान नवीन प्रयोग करणाऱ्या विरुष्काचा भन्नाट Video व्हायरल

पूरनला मोठे फटके मारण्यासाठी खुली सूट द्यावी

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “लखनऊ सुपर जायंट्स व्यवस्थापनाने पूरनवर कमी दबाव टाकला पाहिजे. आयपीएल २०२३ मध्ये मोठे फटके मारण्यासाठी खुली सूट दिली पाहिजे.” तो म्हणाला, “मला विश्वास आहे की गौतम गंभीर आणि केएल राहुल यांनी निकोलस पूरनला मोठे फटके मारण्याची मोकळीक दिली पाहिजे. कारण अशा खेळाडूला एका मर्यादेपलीकडे तू डाव सावर असं नाही सांगू शकत. त्याच्याकडून प्रत्येक सामना जिंकावा अशी अपेक्षाही तुम्ही करू शकत नाही.”

मोहम्मद कैफ पुढे म्हणाला, “तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करू शकता. जसे की तो येथे १४-१५ लीग सामने खेळण्यासाठी आला आहे आणि पूरनने लखनऊला ४-५ सामने जिंकण्यास मदत केली तर ते पुरेसे आहे. प्रत्येक वेळी निकोलस पूरनसारखा खेळाडू आपली विकेट गमावतो तेव्हा आपल्याला असे वाटते की त्याने चांगली कामगिरी केली नाही. पण पूरनसारख्या पॉवर हिटरला मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी प्रेरित करा.”

हेही वाचा: Kohli on Anushka: सेल्फीसाठी एक चाहता अनुष्काजवळ आला अन् विराट कोहली भडकला, Video व्हायरल

आयपीएल २०२३ मध्ये गौतम गंभीर आणि केएल राहुल यांनी संघाचा फलंदाज निकोलस पूरनला खेळण्यासाठी मोकळा हात दिला पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे आहे. आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केल्यापासून पूरन हा एक गूढच राहिला आहे. वेस्ट इंडिजचा हा धडाकेबाज फलंदाज अद्याप आयपीएलमध्ये पूर्ण क्षमतेने खेळू शकलेला नाही. जरी तो आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी खेळला आहे. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएलच्या मिनी लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने १६ कोटी रुपये खर्च करून निकोलस पूरनचा संघात समावेश केला होता.

Story img Loader