Jason Roy IPL 2023: ८ मार्च २०२३… ही ती तारीख आहे जेव्हा पाकिस्तानमध्ये धावांचा भूकंप झाला होता. जेव्हा इंग्लंडच्या सलामीवीराने पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यात कहर केला होता. आम्ही बोलत आहोत जेसन रॉयबद्दल, ज्याने पीएसएलच्या ८व्या हंगामात केवळ ४४ चेंडूत शतक झळकावून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आता हाच जेसन रॉय आयपीएल २०२३ मध्ये खेळताना दिसणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने जेसन रॉयला आपल्या संघात सामील केले आहे.

आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला शाकिब अल हसनच्या रूपाने मोठा धक्का बसला. आंतरराष्ट्रीय कर्तव्य आणि वैयक्तिक कारणांमुळे शाकिब आयपीएलच्या १६व्या हंगामात केकेआरचा भाग होऊ शकला नाही. आता कोलकाताने इंग्लंडचा वेगवान फलंदाज जेसन रॉयला आयपीएलसाठी संघाचा भाग बनवले आहे. रॉय हा त्याच्या आक्रमक फलंदाजासाठी ओळखला जातो. त्याच्या टी२० कारकिर्दीत त्याने आतापर्यंत एकूण ६ शतके झळकावली आहेत.

india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
nashik banned nylon manja caused fatalities and power outages
नाशिकमध्ये नायलॉन मांजा तारांमध्ये अडकून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार
India aims to be FMD free by 2030
पाच वर्षांत देश ‘एफएमडी’ मुक्त करण्याचा संंकल्प, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांची माहिती
youth of Nashik came to Aheri and raped minor girl after friendship through online gaming called Free Fire
गडचिरोली : धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
PCB confident about stadium renovation assures that preparations for Champions Trophy are on track
स्टेडियम नूतनीकरणाबाबत ‘पीसीबी’ निश्चिंत; चॅम्पियन्स करंडकाची तयारी प्रगतिपथावर असल्याची ग्वाही
lokmanas
लोकमानस: उद्याोग हवे तर अणुऊर्जा अपरिहार्य

शाकिब अल हसनला डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या मिनी लिलावात केकेआरने १.५ कोटींची किंमत देऊन संघाचा भाग बनवले होते, परंतु काही कारणांमुळे तो यावर्षी स्पर्धेचा भाग होऊ शकला नाही. आता त्याच्या जागी जेसन रॉय केकेआर संघाचा भाग बनला आहे. रॉय क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळत होता आणि सलामीवीराने ६३ चेंडूत १४५ धावा केल्या. रॉयचा स्ट्राईक रेट २३० पेक्षा जास्त होता आणि त्याच्या बॅटमधून ५ षटकार आणि २० चौकार आले. त्याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर क्वेटा संघाने १० चेंडू आधीच २४१ धावांचे लक्ष्य गाठले होते.

हेही वाचा: IPL 2023:  कारगिल युद्धात लढणाऱ्या नेम सिंहचा मुलगा ध्रुव जुरेल, ज्याने राजस्थान रॉयल्सला विजयानजीक नेले, जाणून घ्या

जेसन रॉय पाच वर्षात फक्त तीन आयपीएल हंगाम खेळला

जेसन रॉयने गेल्या वर्षी आयपीएलमधून आपले नाव काढून घेतले होते. या खेळाडूला गुजरात टायटन्सने २ कोटी रुपयांना खरेदी केले. हा खेळाडू २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळला होता आणि आतापर्यंत या स्पर्धेत रॉयने १३ सामन्यात २९.९० च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. रॉय यांचा स्ट्राइक रेट १२९ पेक्षा जास्त आहे.

रॉय हा या आकड्यापेक्षा खूप चांगला स्ट्रायकर आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाने ६६४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५२२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याचा फलंदाजीचा स्ट्राइक रेट १३७ पेक्षा जास्त आहे. रॉय सध्या रंगात आला आहे आणि त्यामुळेच कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यावर बाजी मारली आहे. आता रॉयला संधी मिळाल्यावर तो कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल.

हेही वाचा: IPL 2023: “सलग दोन वाईड बॉलवर एक फ्री हिट!” माजी भारतीय दिग्गज सुनील गावसकरांचा अजब फॉर्म्युला

कोलकातासमोर आज बंगळुरूचे आव्हान

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर तब्बल १४३८ दिवसांनी ‘आयपीएल’चा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला कोलकाताचा संघमालक आणि प्रसिद्ध सिनेअभिनेता शाहरुख खान उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यातच प्रतिस्पर्धी बंगळूरु संघात विराट कोहलीसारखा खेळाडू असल्याने या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असेल. कोलकाता आणि बंगळूरु या संघांची हंगामाची सुरुवात भिन्न राहिली आहे. कोलकाताला सलामीच्या लढतीत पंजाबकडून पराभव पत्करावा लागला, तर बंगळूरुने पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सवर सहज मात केली.

Story img Loader