Virat Kohli fights with Naveen Ul Haq video: लखनऊ सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सोमवारी आयपीएल २०२३चा ४३वा सामना वादांनी भरलेला होता. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा नवीन-उल-हकसोबत वाद झाला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांमधील वातावरण आणखीनच बिघडले कारण, विराट कोहली आणि लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. परिस्थिती इतकी बिघडली की शेवटी दोन्ही संघांच्या खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.

डावाच्या १७व्या षटकात अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकसोबत विराट कोहलीची बाचाबाची झाली, ज्यामध्ये अमित मिश्रा हस्तक्षेप केला आणि नंतर अंपायर्सने येऊन प्रकरण शांत केले. पुढच्या षटकात, ब्रॉडकास्टरने पूर्ण फुटेज मोठ्या स्क्रीनवर दाखवले, जिथे कोहली काहीतरी बोलत होता आणि नवीन त्याला प्रत्युत्तर देताना दिसला. कोहली काही बोलला आणि मग नवीनकडे निशाणा करत आपला बूट दाखवला.

BJP leader Navneet Rana launched open campaign against mahayuti in Daryapur heating up atmosphere
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

कोहली काय म्हणाला हे स्पष्ट झाले नाही, परंतु त्याच्या उंचीच्या खेळाडूला बूट दाखवणे आणि कोणत्याही परिस्थितीत बोट दाखवून तरुण खेळाडूशी बोलणे योग्य नाही. अंपायर्सने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. नंतर कोहलीने वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांच्याशी चर्चा केली हे दोघे बोलत असताना अंपायर्स मध्यभागी उभे राहिले.

फुटेजमध्ये कोहलीला मिश्राने शांत राहण्याचा सल्ला दिला होता आणि त्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूने आरसीबीच्या माजी कर्णधाराकडे एक नजर टाकली होती. सामना संपल्यानंतर खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी समोरासमोर आले. कोहली आणि नवीन यांनी हस्तांदोलन केले, मात्र त्यानंतरच दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमक झाली. कोहलीने सुरुवातीला लक्ष दिले नाही आणि पुढच्या खेळाडूशी हस्तांदोलन करण्यासाठी तो गेला, परंतु नवीनकडे बघून पुन्हा मागे वळला आणि दोघांमध्ये पुन्हा शब्दांची देवाणघेवाण झाली.

हेही वाचा: IPL2023: कोहली-गंभीर वादावर रवी शास्त्रींचे सूचक विधान, म्हणाले की, “हे सर्व काही एका…”

चाहते व्हिडिओ पाहून भडकले

“नवीन उल हक म्हणजे विराटच्या पायाची धूळ आहे”, असे एका यूजरने विराटला असे सांगायचे असेल असे म्हणत त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे. तर दुसऱ्या एका ट्वीट मध्ये दुसऱ्या यूजरने म्हटले की, “चारित्र्य सर्वकाही बोलते, ही आक्रमकता नाही, हा अनादर आणि अहंकार आहे. तिसऱ्या यूजरने यावर कमेंट करताना लिहिले आहे की, “पैसा सर्वकाही नसतो मिस्टर कोहली, ऊपरवाला सब देख रहा है.” अशा संतप्त प्रतिक्रिया या घटनेवर सोशल मीडियामध्ये येत आहेत. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना धावफलकावर १२६ धावा लावल्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ १०८ धावांत आटोपला. आरसीबीचा संघ १० गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.