IPL 2023, Royal Challengers Bangalore: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा पराभव करून IPL २०२३च्या १६व्या हंगामाची शानदार सुरुवात केली. मात्र, आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी संघाला पुढील दोन महिन्यांत आणखी बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. या संदर्भात, विराट कोहलीने आरसीबी इनसाइडरच्या एका एपिसोडमध्ये मिस्टर नॅग्सशी स्पष्ट गप्पा मारल्या, जिथे दोघांनी फ्रेंचायझीच्या सोशल मीडिया कामगिरीबद्दल देखील चर्चा केली.
फ्रँचायझी मोठी आहे त्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षाही खूप आहेत – कोहली
खरं तर, मुंबई इंडियन्सवर आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा विराट कोहली म्हणाला की, बंगळुरू संघ ही ‘मोठी फ्रेंचायझी’ आहे म्हणूनच चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत.” पुढे कोहली म्हणाला, “आमची सोशल मीडियाची कामगिरी इतरांपेक्षा मैलांनी पुढे आहे. तुम्ही एकदा सोशल मीडिया ट्रॉफी आणा आणि मग बघा आरसीबी कशी जिंकते.” असा टोला त्याने ट्रोलर्सला लगावला.
विराट कोहली फॉर्ममध्ये येण्याआधी, जेव्हा तो खराब फॉर्ममधून जात होता, तेव्हा त्याला यामागील कारण विचारले असता तो म्हणाला, “मी २०१९ सालानंतर पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये आलो आहे. या हॉटेलमध्ये आम्ही आधी राहायचो पण या हॉटेलमध्ये किती खोल्या आहेत, लॉन कुठे आहे, बंगळुरू शहर किती छान आहे हे मला माहीत नव्हते. मला आता या सगळ्या गोष्टी जाणवत आहे. पूर्वी खूप दडपण असायचे जे आता नाही.” कोहलीने असे उत्तर देत खराब फॉर्मच्या प्रश्नाला बगल दिली.
आम्ही फालतू संघ नाही आहोत- कोहली
आरसीबी इनसाइडरमध्ये, जेव्हा मिस्टर नागा यांनी कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या फॅन फॉलोइंगबद्दल विचारले तेव्हा विराट म्हणाला, “आरसीबी ही एक मोठी फ्रेंचाइजी आहे. ही एक छोटी फ्रँचायझी आहे आणि म्हणूनच सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तुम्ही सोशल मीडियावर स्पर्धा करा आणि रिअल माद्रिद आणि लिव्हरपूलला विसरून जा, आम्ही स्पर्धा जिंकू.” फॅन फॉलोइंगनुसार रिअल माद्रिद आणि लिव्हरपूलनंतर आरसीबी जगातील तिसरी सर्वात मोठी फ्रेंचाइजी आहे.
पुढे तो म्हणाला की, “सोशल मीडियावर काहीजण आमच्या संघाला फालतू संघ म्हणतात जर आम्ही फालतू असू तर मग आमच्याकडून ट्रॉफी जिंकण्याची अपेक्षा का ठेवतात? पहिला मुद्दा तर आम्ही फालतू संघ नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर जे लोकं बोलतात त्यांना आपल्या खेळीने उत्तर द्यायला मला आवडेल.” असे म्हणत त्याने ट्रोलर्सला ठणकावून सांगितले.
वास्तविक, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे सुरुवातीपासूनच एक मोठा संघ म्हणून पाहिले जात आहे, परंतु आरसीबीला अद्याप ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत अनेकदा संघावरही प्रश्न उपस्थित केले जातात. आरसीबी इनसाइडरच्या एका एपिसोडमध्ये कोहली आणि मिस्टर नाग्स यांच्यात या संदर्भात मोकळेपणाने संभाषण झाले होते, ज्यावर कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. आरसीबीचा पुढील सामना ६ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.