आयपीएल २०२३ मध्ये दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (४ एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी घरच्या मैदानावर उतरलेल्या दिल्लीला पुन्हा एकदा विजय मिळवण्यात अपयश आले. गतविजेत्या गुजरातने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन करत ६ गडी राखून विजय मिळवला. सरफराज खान त्याच्या कालच्या सामन्यात केवळ ९ धावा करून बाद झाला.

गुजरात टायटन्स विरुद्ध आयपीएल २०२३च्या सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक सौरव गांगुली म्हणाला की, “संघ व्यवस्थापन अक्षर पटेलला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्याचा गांभीर्याने विचार करत होता पण तो सपशेल फेल गेला.” गांगुली म्हणाला, “जर त्याची फलंदाजी सुधारली असेल तर तो वरच्या क्रमाने खेळायला येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर त्याने शानदार फलंदाजी केली. आशा आहे की तो आमच्यासाठी धावा करू शकेल.” मागील दोन सामन्यात दिल्लीचा पराभव झाल्यानंतर पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांच्याबाबत मेंटॉर सौरव गांगुलीने मोठे विधान केले आहे.

Satej Patil On Municipal Elections 2025
Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?

हेही वाचा: IPL 2023: हार्दिक पांड्याला मिळाली केन विल्यमसनची रिप्लेसमेंट! गुजरात संघाने मागवला शेजारील देशातून ‘हा’ धाकड खेळाडू

या प्रकरणावर गांगुली संतापला

सपाट खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना मारल्याबद्दल त्याला सहानुभूती होती. तो म्हणाला, “जेव्हा वेस्ट इंडिजचे खेळाडू येतात आणि त्याचे चेंडू मारतात तेव्हा त्याच्यासाठी हे सोपे नसते. मायर्स, पूरन, रसेल आणि पॉवेल हे तिघेही टी२० क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमकपणे खेळतात.” पृथ्वी शॉला वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्रास होत आहे. या विधानावर गांगुली म्हणाला की, “एका सामन्याच्या आधारे न्याय करू नये. पृथ्वी, सरफराज यांच्या बाबतीत एवढ्या लवकर मत तयार करायला मला तरी पटत नाही. पहिल्याच सामन्यात सरफराज लवकर बाद झाला तर त्याच्यावर टीका करणे योग्य नाही.”

माजी टीम इंडियाचा कर्णधार म्हणाला, “प्रत्येकाने वेगवान गोलंदाजांचा सामना करायला शिकले पाहिजे. पृथ्वीने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा केल्या आहेत. तो एका चांगल्या चेंडूवर बाद झाला. मिचेल मार्श देखील लवकर बाद झाला ज्याने आयुष्यभर वेगवान गोलंदाजीचा सामना केला. खेळात असेच घडते.” सरफराज खान संपूर्ण हंगामात खेळू शकेल का असे विचारले असता गांगुली म्हणाला, “हा एक चांगला प्रश्न आहे आणि उद्या पहा तो मोठी खेळी करेल.”

हेही वाचा: IPL 2023: ऑनरिक नॉर्खियाचा रॉकेट बॉलसमोर शुबमन गिलच्या दांड्या गुल, धारदार गोलंदाजीचा; Video व्हायरल

माजी बीसीसीआय अध्यक्ष म्हणाला, “बहुतेक संघांना अशा यष्टिरक्षकांची गरज असते जे फलंदाजी करू शकतात. सरफराजने हजारे ट्रॉफीमध्ये विकेटकीपिंग केले होते. त्याने फक्त २० षटके यष्टीरक्षण केले त्यामुळे एवढ्या लवकर त्याच्याबद्दल कोणताही निर्णय घेऊ नये. सध्या आमच्याकडे ऋषभ पंतही नाही.”

Story img Loader