मुंबईचे फलंदाज एका बाजूला गोलंदाजांसमोर नांगी टाकत होते त्याचवेळी दुसरीकडे सूर्यकुमार यादवची फलंदाजी दबावाच्या परिस्थितीत आणखीचं बहरून निघाली. हेच दृश्य मंगळवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पॉवरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण सूर्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह अफलातून फलंदाजी करत ८३ धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीने मुंबईला केवळ १६.३ षटकात संघाला विजय मिळवून दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या सामन्यात मुंबईच्या विजयापेक्षा डीआरएस निर्णयाचीच चर्चा होत आहे. कर्णधार रोहित शर्माला DRS अंतर्गत एलबीडब्ल्यू आऊट करण्यात आले. यावर मोहम्मद कैफ आणि मुनाफ पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, खुद्द रोहितलाही आश्चर्य वाटले. पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही तो रिप्ले पाहत होता आणि संघातील इतर खेळाडूंचाही या निर्णयावर विश्वास बसत नव्हता.
रोहित ३.५ मीटरपेक्षा जास्त अंतराने क्रीजच्या बाहेर होता
वास्तविक, रोहितला वानिंदू हसरंगाच्या ५व्या षटकातील शेवटचा चेंडू क्रीजच्या पलीकडे खेळायचा होता. त्याचा मिडविकेटला मारण्याचा शॉट पूर्णपणे चुकला, चेंडू पॅडला लागला. यावर आरसीबीने डीआरएस घेतला, त्यानंतर तिसऱ्या अंपायरने त्याला आऊट घोषित केले. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. रोहित ३.५ मीटरपेक्षा जास्त अंतराने क्रीजच्या बाहेर होता. अशा परिस्थितीत त्याला बाद करणे समजण्यापलीकडे होते. यावर मुनाफ पटेलने त्याचे म्हणणे मांडत हे अंतर स्पष्ट केले. तो म्हणाला की, “आता डीआरएससाठीही डीआरएस घ्यावे लागेल. दुर्दैवी रोहित शर्मा. जनता काय म्हणते, बाहेर आहे की आत? मला वाटते हा निर्णय अंपायरने चुकीचा घेतला आहे. यावर चर्चा व्हायला हवी.”
मुनाफपाठोपाठ कैफनेही फटकारले
दुसरीकडे, कैफने लिहिले, “DRS ये थोड़ा ज्यादा नहीं हो गया म्हणजेच मराठीत हॅलो डीआरएस हे जरा जास्तच आहे. तो एलबीडब्ल्यू आऊट कसा होऊ शकतो. या मोसमात सलग पाचव्यांदा त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही. रोहित आयपीएलमध्ये ७२व्यांदा सिंगल डिजिट धावसंख्येवर आऊट झाला असून त्याच्या नावे नकोसा विक्रम झाला आहे.
या विजयासह मुंबई इंडियन्स तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर युवा फलंदाज नेहल वढेरानेही मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून अर्धशतक पूर्ण करण्याबरोबरच संघाचा विजय निश्चित करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता. वढेराने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५२ धावा केल्या आणि सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत १४० धावांची विजयी भागीदारी केली. या विजयासह मुंबई संघाने गुणतालिकेत आठव्या स्थानावरून तिसर्या स्थानावर मोठी झेप घेतली आहे.
तत्पूर्वी, ग्लेन मॅक्सवेलने (६८ धावा, ३३ चेंडू, ८ चौकार, ४ षटकार) आणखी एक धडाकेबाज खेळी केली. दुसरीकडे फाफ डुप्लेसिसने (६५ धावा, ४१ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार) आपली उत्कृष्ट लय कायम ठेवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६२ चेंडूत १२० धावांची भागीदारी केली. याच भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सहा गडी गमावून १९९ धावा केल्या.
हेही वाचा: Kohli vs Naveen: जित्याची खोड…, बंगळुरूचा पराभव अन् नवीन उल हकने विराटला पुन्हा डिवचले
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाची सुरुवात सकारात्मक झाली. इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला पण रोहित शर्मा संघर्ष करताना दिसला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. यामध्ये इशान किशनने २१ चेंडूत ४२ धावा केल्या, तर रोहितचे योगदान केवळ सात धावांचे होते. इशांत आणि रोहितला बाद केल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमारला बढती मिळाली, सूर्यकुमार आणि युवा फलंदाज नेहल वढेरा यांनी मुंबईला शानदार विजय मिळवून दिला.