Shubman Gill’s sister Shahneel Gill: आयपीएल २०२३मध्ये रविवारी अप्रतिम नाट्य पाहायला मिळाले. काल साखळी फेरीत दोन रोमांचक सामने खेळले गेले. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांना प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी विजयाची गरज होती. मात्र, बंगळुरूला तसे करता आले नाही. मुंबईने सनरायझर्स हैदराबादला हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवले, पण गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून स्पर्धेतून बाहेर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुबमन गिलच्या शतकाने विराट कोहलीचे शतक झाकोळले गेले. मात्र, आरसीबीच्या काही चाहत्यांना हा पराभव पचवता आला नाही. यानंतर आरसीबीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुबमन आणि त्याच्या बहिणीसाठी अपशब्द वापरले आहेत. विशेषत: शुबमनची बहीण शाहनील गिलच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत, काहींनी अपशब्द वापरले.

शाहनीलने इंस्टाग्रामवर गुजरात विरुद्ध लखनऊ सामन्याचा फोटो खूप पूर्वी शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये एका यूजरने लिहिले, “किती छान दिवस होते…” या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शाहनील आणि शुबमन दोघांसाठी अपमानास्पद कमेंट्स लिहिल्या. त्याचवेळी काही लोकांनी तसे न करण्याचे आवाहनही केले. शुबमन आणि त्याच्या बहिणीसाठी असभ्य टिप्पण्या पाहून अनेक चाहत्यांनी ट्विटरवर जाऊन अपशब्द वापरणाऱ्यांना चांगलेच सुनावले.

टी२० लीगच्या १६व्या आवृत्तीत शुबमनने आरसीबीची मोहीम संपवली हे पाहून काही चाहत्यांना आनंद झाला नाही, तर निकालाबद्दल शुबमन आणि कोहली यांच्यात कोणतेही वैर नव्हते. खरं तर, सामना संपल्यानंतर कोहलीने शुबमनला मिठी मारली आणि हसत हसत त्याच्या पाठीवर थाप दिली आणि त्याच्या चांगल्या खेळीसाठी अभिनंदन केले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, आयपीएल २०२३च्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा पराभव करणाऱ्या गुजरात टायटन्सने शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने पाच गडी गमावून १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.१ षटकांत चार गडी गमावून १९८ धावा केल्या आणि सामना जिंकला. बंगळुरूकडून विराट कोहलीने नाबाद १०१ धावांची खेळी केली. त्याचवेळी गुजरातकडून शुबमन गिलने नाबाद १०४ धावांची खेळी केली.