भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या त्याच्या फॉर्ममुळे चर्चेत आहे. भारतीय संघाला ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्याआधी भारतीय संघ व्यवस्थापनाला खेळाडूंवरील कामाचा बोजा सांभाळायचा आहे. अलीकडेच अनुभवी सुनील गावसकर यांनीही रोहितला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला होता. आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धाही यावर्षी खेळल्या जाणार आहेत. त्या संदर्भात आयपीएलपेक्षा राष्ट्रीय कर्तव्यासाठी भारतीय कर्णधाराची उपस्थिती महत्त्वाची ठरेल. यासंदर्भात आता त्याच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाने मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी शनिवारी या विषयावर विधान केले. ते म्हणाले की, “संघाचा कर्णधार रोहित शर्माने सध्याच्या लीगमधून ब्रेक मागितलेला नाही, परंतु जर त्याने तसा प्रस्ताव दिला तर त्यावर विचार केला जाईल. रोहित गेल्या काही काळापासून सातत्यपूर्ण क्रिकेट खेळत आहे आणि माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी अलीकडेच भारतीय कर्णधार रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्वत:ला फ्रेश कसे ठेवावे यासाठी आयपीएलमधून ब्रेक घ्यावा, असा सल्ला दिला.

हेही वाचा: WTC Final: एम. एस. धोनी WTC फायनलसाठी टीम इंडियामध्ये परतणार? रवी शास्त्रींचे मोठे विधान

रोहित शर्माने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत सात सामन्यांच्या सात डावात १८१ धावा केल्या आहेत. त्याने अनेक सामन्यांमध्ये सुरुवात केली आहे परंतु तो आपला डाव फार पुढे नेऊ शकला नाही. त्याने आतापर्यंत या मोसमात केवळ एक अर्धशतक केले आहे आणि ६५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याची सरासरी २५.८६ असून स्ट्राइक रेट १३५च्या जवळ आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने शतक झळकावले. यानंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही त्याने शतक ठोकले. मात्र तो आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याच्या नावलौकिकानुसार खेळू शकलेला नाही. हिटमॅनचा जुना अवतार पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, त्याच्या फिटनेस आणि फॉर्मवरही भारतीय संघ व्यवस्थापन लक्ष ठेवणार आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक रद्द? पाकिस्तानचा आडमुठेपणा ठेचण्यासाठी BCCIने आखली नवी योजना

राजस्थानच्या सामन्यात मुंबईचा सहा विकेट्सने विजय

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने रविवारी मुंबई येथे आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवून संघाला विजयी मार्ग दाखवला. २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्या दमदार फलंदाजीमुळे मुंबईने १९.३ षटकांत ४ विकेट्सच्या मोबदल्यात २१४ पर्यंत मजल मारली. सूर्यकुमारने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक नोंदवले, त्याने २९ चेंडूत ५५ धावा फटकावल्या, तर डेव्हिडने १४ चेंडूत नाबाद ४५ धावा फटकावल्या. ग्रीननेही २६ चेंडूंत ४४ धावा केल्या आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे मुंबईला वानखेडेवर विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्यात मदत झाली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 will rohit sharma take a break from ipl 2023 indicative statement of the coach of mumbai indians gavaskar also replied avw
Show comments