Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians Playing 11 Prediction: पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आज सुपर संडेवर डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी सामना करत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि बंगळुरूचे संघ जेव्हा जेव्हा भिडतात तेव्हा मैदानावर एक वेगळाच रोमांच पाहायला मिळतो. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. हा सामना संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच ७.०० वाजता होईल. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे, जो फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडू शकतो.
टिम डेव्हिडला मुंबईचा खास वडापाव लागला तिखट
मुंबईसह प्रत्येक टीमला त्यांच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवून हंगामची जोरदार सुरुवात करायची आहे. अशातच परदेशी खेळाडूंनी भारताच्या खासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर त्याची गोष्टचं निराळी…असंच मुंबईच्या टिम डेव्हिड सोबत मराठी पचका झालाय. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये काही मराठी कंटेट क्रिएटर टीम डेविडची मजा घेताना दिसत आहेत. हे दोघं मराठीमध्ये बोलतायत त्यामुळे टिमला त्यातील काहीही कळत नाहीये. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरील हा व्हिडीओ मात्र तुफान आवडला आहे.
इंस्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये दोन मराठी मुलं टिम डेव्हिडसोबत रील बनवण्यासाठीची आयडिया त्याला सांगत आहेत. यावेळी ही मुलं वडापावबाबत चर्चा करत असतात. टिमला त्यांची वाक्य त्याच्या तोंडून वदवून घ्यायला सांगतात. त्यात ‘तुला वडापाव तिखट लागला,’ असं म्हण, हे देखील सांगतात. मात्र ही मुलं मराठीमध्ये बोलत असल्याने टीमला त्यांचं संभाषण कळत नाहीये. मात्र तरीही तो, साउंड गुड, असं म्हणतो. यानंतर ही मुलं टिमला मराठी येत नसल्याचा फायदा घेत अजून त्याची मजा घेतात. हे सर्व झाल्यानंतर तुझ्यासोबत प्रँक केला असल्याचा खुलासा केला जातो. यावरून टिम देखील जोरजोरात हसू लागतो. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांतं लक्ष वेधतोय.
दोन्ही संघाचे हे खेळाडू जखमी झाले आहेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, तर काही खेळाडू अद्याप संघात सहभागी झालेले नाहीत. जोश हेझलवूड, रजत पाटीदार हे दुखापतीमुळे पहिल्या काही सामन्यांतून बाहेर पडले आहेत. तो संघात जाणार की नाही हे अद्यापही ठरलेले नाही. त्याचवेळी वानिंदू हसरंगा न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. काही सामन्यांनंतर तो आरसीबी संघात सामील होईल. त्याचवेळी मुंबई इंडियन्ससाठी बुमराहशिवाय जे रिचर्डसनही दुखापतग्रस्त आहे. बुमराहच्या जागी मुंबईने संदीप वारियरला संघात सामील केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
बंगळुरूचा प्लेइंग-११ काय असू शकतो
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, मायकेल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोपली, मोहम्मद सिराज.
मुंबई इंडियन्स
मुंबई संघाने प्रथम फलंदाजी केली तर
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, रमणदीप सिंग, जोफ्रा आर्चर, हृतिक शोकीन, संदीप वॉरियर, जेसन बेहरेनडॉर्फ.