Gautam Gambhir vs Virat Kohli IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात खडाजंगी झाली. गंभीर आणि कोहली यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे. आता या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आले आहे. रिपोर्टनुसार, कोहलीला आक्रमक पाहून गंभीर त्याच्या दिशेने सरकला आणि प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कोहली म्हणाला की, “मी तुम्हाला काहीच बोललो नाही.” यानंतर हे प्रकरण पुढे गेले. त्यानंतर खेळाडूंनी प्रकरण शांत केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान कोहली अतिशय आक्रमकपणे सेलिब्रेशन करत होता. गौतम गंभीरला त्याची ही पद्धत आवडली नाही. यानंतर सामन्यात नवीन-उल-हक आणि अमित मिश्रासोबत वाद झाला. सामना संपल्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात वाद वाढला. इनसाइड स्पोर्टवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गंभीरने कोहलीला विचारले, “क्या बोल रहा है बोल?” विराटने उत्तर दिले, “मी तुला काहीच सांगितले नाही किंवा बोललो नाही, तू का या भांडणात पडत आहेस?”

कोहलीच्या उत्तरानंतर गंभीरने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हणाला, “तुने अगर मेरे खिलाड़ी को बोला है, अर्थात “तूने मेरी परिवार को गली दी है म्हणजेच तू माझ्या कुटुंबाला शिवी दिली.” यावर कोहलीने सडेतोड प्रत्युतर दिले. तो म्हणाला, “तू तर तुझ्या कुटुंबाला शिवी दिली आहे.” गंभीर म्हणाला, “म्हणजे आता तू मला शिकवणार का?”

इनसाइड स्पोर्ट्सच्या सूत्राने सांगितले की, “जेव्हा कोहलीने ही टिप्पणी केली तेव्हा गंभीरला प्रकरण समजले आणि ते प्रकरण वाढण्यापूर्वी त्याने मेयर्सला बाजूला केले. त्याच्यासोबत मेयर्सला गंभीर घेऊन गेला. त्यानंतर झालेला वाद जरा बालिश वाटला. गंभीरने (कोहलीला) विचारले, बोल काय म्हणत आहे? यावर कोहली म्हणाला, मी तुला काहीच सांगितले नाही, तू का यात पडत आहेस?”

हेही वाचा: Virat vs Gambhir: विराटला सामनावीराचा पुरस्कार देणारा एकेकाळचा मित्र का झाला शत्रू? जाणून घ्या संपूर्ण कहाणी

विशेष म्हणजे विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादावर कडक कारवाई करण्यात आली आहे. कोहली आणि गंभीरची संपूर्ण मॅच फी कापण्यात आली आहे. यामुळे कोहलीचे सुमारे १.०७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे, गंभीरचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. नवीन-उल-हकला मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएल २०२३च्या मोसमातही कोहली आणि गंभीर यांच्यात लढत झाली होती. तेव्हा गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता. पण यावेळी तो लखनऊ संघाचा मार्गदर्शक आहे. त्याचवेळी या आयपीएलमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली एकमेकांना मिठी मारताना दिसले. १० एप्रिल रोजी लखनऊने बंगळुरूला हरवले तेव्हाचे हे दृश्य आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 you abused my family eyewitness told the reason for the tussle between gautam gambhir and virat kohli avw