देशात सध्या IPL२०२३ आणि लग्नाचा सीझन जोरदार सुरु आहे. त्यामागील कारणही तसेच आहे, सलग दोन वर्ष कोरोना असल्याने क्रिकेट चाहते आणि लग्न अतिशय सध्या पद्धतीने झाले. त्या दोन वर्षाची भरपाई म्हणून यंदा धमाल, मजा, मस्ती करत चाहते आनंद घेत आहेत. त्यात आयपीएलवर आधारित असेच काही लग्नातील उखाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसऱ्या बाजूला आयपीएल सुरु होऊन काही दिवसच झाले आहेत आणि त्यात वेगवेगळ्या माध्यमांना वाचक, क्रिकेट रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नातील असेच काही मनोरंजक उखाणे

फेसबुकवर सध्या अशाच नुकतेच नवीन लग्न झालेल्या एका विवाहित जोडप्याचा आयपीएलवरील उखाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. वधू-वरांप्रमाणे नातेवाईकही त्यात मजेशीर उखाणा घेत असल्याचा रील व्हिडिओत दिसत आहे. त्यात नवदांपत्याचे उखाणे पुढीलप्रमाणे:

वधू (भाग्यश्री): “ सुमितराव माझे डायमंड मी त्यांची रिंग, आयपीएलची शान म्हणजे चेन्नई सुपर किंग्स”

वर (सुमित): “भाग्याचा नाव घेतो चेन्नई सुपर किंग्सचा मान राखून भाग्याची शपथ घेऊनच सांगतो यावर्षी मुंबईच जिंकेल ते पण चार गडी राखून…”

नातेवाईक: “मुंबई आणि चेन्नईचे फॅन नेहमी करतात विस्फोट मला नाही वाटत यांचे जास्त टिकेल लवकरच होईल यांचा घटस्फोट…” पुढे त्याला दोन्ही गंमतीत मारतात मग तो म्हणतो, “यावर्षी बहुतेक रॉयल चॅलेंजर बंगळुरू जिंकणार असं वाटत…”असे अतरंगी रील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. वधू ही चेन्नई सुपर किंग्सची फॅन तर वर हा मुंबई इंडियन्सची फॅन असतो.

दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव

आयपीएल २०२३ मध्ये दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (४ एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. हंगामातील पहिला विजय मिळवण्यासाठी घरच्या मैदानावर उतरलेल्या दिल्लीला पुन्हा एकदा विजयी रेषेपार जाण्यात अपयश आले. गतविजेत्या गुजरातने उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन करत ६ गडी राखून विजय मिळवला.

हेही वाचा: IPL 2023: सेहवागने हंगाम संपण्यापूर्वी वर्तवला अंदाज, केएल राहुल, कोहली, रोहित नाही तर ‘हे’ चार खेळाडू ऑरेंज कॅपवर सांगणार दावा

१६३ या धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात देखील फारशी चांगली नव्हती. गुजरातचे दोन्ही सलामीवीर वृद्धिमान साहा व शुबमन गिल यांच्यासह कर्णधार हार्दिक पांड्या पॉवर-प्ले मध्येच तंबूत परतला. संघ अडचणीत असताना तमिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक भागीदाऱ्या केलेले साई सुदर्शन व विजय शंकर हे संघाच्या मदतीला धावून आले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शंकर २९ धावा करत माघारी परतल्यानंतर, हंगामातील पहिलाच सामना खेळत असलेल्या डेव्हिड मिलरने आपला दर्जा दाखवला. त्याने फटकेबाजी करत संघाचा विजय जवळ आणला. दरम्यान सुदर्शनने स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. अखेर या दोघांनी संघाचा विजय साकार केला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 you are my diamond im your ring who will be ipl kingwedding season comes with ipl fever video viral avw