भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल २०२३ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तो या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही आहे. त्याचा संघही चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवल्यानंतर संघाने गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ते प्लेऑफमध्येही पोहोचतील हे निश्चित दिसते. दरम्यान, युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल व्हिडिओमध्ये चहल दारूच्या नशेत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या व्हिडिओमध्ये त्याला सरळ चालताही येत नव्हते. त्याच्यासोबत चालणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आहे. तीच व्यक्ती गाडीचे दार उघडून त्यांना ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या शीटवर बसवते. कारमध्ये बसूनही चहल अस्वस्थ दिसत आहे. कारच्या विंडशील्डवर मुंबई इंडियन्सचा लोगो चिकटवण्यात आला आहे.
वास्तविक व्हिडिओमध्ये युजवेंद्र चहल मद्यधुंद अवस्थेत स्वतःला सांभाळू देखील शकत नव्हता, तो अनियंत्रित झाल्याचे दिसून येत आहे. गाडीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला कोणत्या तरी व्यक्तीची मदत घ्यावी लागत होती. यादरम्यान चहलने पापाराझींना त्याचे छायाचित्र क्लिक करण्यास नकार दिला आणि व्हिडिओमध्ये तो मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. मात्र, हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांच्या सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत, यावरून तो ट्रोलही झाला.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीला तो उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. त्याच पार्टीतून बाहेर पडताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. असे सांगण्यात येत आहे की रोहितचा वाढदिवस ३० एप्रिलला आहे आणि त्याआधी त्याने एक मोठी पार्टी आयोजित केली होती. मात्र, लोकसत्ता असा दावा करत नाही की चहल दारूच्या नशेत होता की आणखी काही त्याला समस्या होती. यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही बातमी देत आहोत पण या व्हिडिओची आम्ही पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा: आंदोलनाला वेगळय़ा दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न – बजरंग
राजस्थानचा पुढचा सामना मुंबईविरुद्ध खेळणार आहे
राजस्थान रॉयल्सला आता मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना ३० एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. चहलने मुंबईसाठीच आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात सामील झाला. या हंगामात मुंबईला ७ सामन्यात केवळ ३ विजय मिळाले आहेत. रोहित शर्माचा संघ गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आहे. चहलने आतापर्यंत ८ सामन्यात १२ फलंदाजांना बाद केले आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो ७ व्या क्रमांकावर आहे. तो राजस्थानसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. एका वेळी त्याच्याकडे पर्पल कॅपही होती. पण सध्या तो पर्पल कॅप मिळवण्यापासून फक्त दोन विकेट्स दूर आहे.