Ambati Rayudu Gives Biryani Party CSK Players: चेन्नई सुपर किंग्सचा सध्या पुढील सामन्यासाठी हैदराबादमध्ये असून शुक्रवारी संघाचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. तत्त्पूर्वी खेळाडूंसाठी सीएसकेचा माजी खेळाडू अंबाती रायडूने बिर्याणी पार्टीचा बेत आखला होता. याआधी एमएस धोनी आणि संघातील इतर खेळाडूंनी या मेजवानीचा आनंद लुटला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

CSK फ्रँचायझीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या बिर्याणी पार्टीचा खास व्हीडिओ शेअर केला आहे. रवींद्र जडेजा, दीपक चहर, शिवम दुबे आणि मुकेश चौधरी यांनी रायडूसोबत पोज देताना दिसले. सुपर किंग्जच्या खेळाडूंनी सामन्यांमधील ४ दिवसांच्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा घेतला आणि रायडूने त्यांना हैदराबादची स्पेशल बिर्याणीचा आस्वाद घेण्याची संधी दिली.

चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंसाठी रायुडूने याआधीही या स्पेशल बिर्याणी पार्टी ठेवली होती. आयपीएल २०२३ दरम्यान, त्याने आपल्या टीममेट्ससाठी बिर्याणी पार्टीचे आयोजन केले होते. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरही रायुडूने सीएसकेच्या खेळाडूंसाठीचा स्वादिष्ट बिर्याणीचा बेत आखण्याची परंपरा सुरू ठेवली. आयपीएल २०२३ नंतर रायुडूने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्याच्या अखेरच्या आयपीएल सामन्यात चेन्नई संघाने आपले पाचवे जेतेपद जिंकले. या विजयानंतर धोनीने ही ट्रॉफी स्वीकारण्याचा मानही रायुडूला दिला होता. सध्या रायुडू आयपीएल सामन्यांचे समालोचन करत आहे.