PBKS VS MI Coin Toss Controversy : आयपीएल २०२४ च्या ३३ व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकली. पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. पण, नाणे टॉसदरम्यान एक मनोरंजक गोष्ट घडली जी पाहून क्रिकेटचे चाहते आश्चर्यचकित झाले. या सामन्यात कर्णधार सॅम करनने नाणे टॉस केले. हार्दिक पांड्याने हेड्स मागितले, पण सॅम कुरन जिंकला. पण मजेशीर गोष्ट अशी की, जेव्हा नाणे जमिनीवर पडले तेव्हा कॅमेरा पूर्णपणे त्यावर फोकस करण्यात आला.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नाणे टॉस करताना कॅमेरा फोकस केला यात काय मोठी गोष्ट आहे. पण, ही आयपीएलमधील सर्वात मोठीच गोष्ट आहे, कारण आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या नाणेफेकीवरून बराच वाद झाला होता. यावेळी नाणेफेकीचा निकाल बदलण्यात आल्याचा आरोप अनेक चाहत्यांनी केला होता. याचे अनेत व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत होते.
त्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकल्याचा दावा केला जात होता, परंतु रेफ्रींच्या चुकीमुळे मुंबईने नाणेफेक जिंकली असे घोषित करण्यात आले. यावेळी रेफ्रींनी जमिनीवरून नाणे उचलून उलटे केल्याचा संशय आला. मात्र, याला दुजोरा मिळाला नाही. आता हे सर्व वाद संपवण्यासाठी मुंबई आणि पंजाब यांच्यातील टॉस उडवल्यानंतर नाण्यावर कॅमेरा फोकस करण्यात आला.
धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार की नाही? जिवलग मित्र सुरेश रैना एकाच शब्दात म्हणाला…; पाहा VIDEO
दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करन हा पंजाब किंग्जचा काळजीवाहू कर्णधारपद म्हणून जबाबदारी सांभाळतोय. यामुळे त्याने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीवेळी हुशारी दाखवली, त्याने नाणं टॉस केल्यानंतर पुढे येत निर्णय योग्य आहे की नाही याची खातरजमा केली. यावेळी कॅमेरामननेदेखील नाण्यावर झूम करत चाहत्यांना आणि प्रेक्षकांना हे नाणं टॉसनंतरचं लाईव्ह दृश्य स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न केला.
यामुळे आता आयपीएलमध्ये नाणेफेकीतही संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला जात असून पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यापासून त्याची सुरुवात झाली आहे.