IPL 2024, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore: शिवम दुबेच्या इम्पॅक्ट पाडणाऱ्या तुफान खेळीसह चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्याच सामन्यात ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला आहे. १९ व्या षटकात २ चौकार आणि एका षटकारासह शिवम दुबेने चेन्नईला सहज विजय मिळवून दिला. जडेजा आणि दुबेची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली मुस्तफिझूर रहमान हा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजी करताना ४ विकेट्स घेत आरसीबीच्या फलंदाजांना वेसण घातले.

चेन्नईच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली पण त्यांनी ठरावीक अंतराने विकेट गमावल्या. प्रत्येक खेळाडूने फलंदाजी करत संघाच्या धावांमध्ये आपले योगदान दिले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शिवम दुबेने पुन्हा एकदा प्रभावी फलंदाजी केली. तर जडेजाने त्याला साथ देत काही मोठे फटके खेळले. १८ चेंडूत १८ धावा असा अटीतटीचा सामना सुरू असताना शिवम दुबेने दोन चौकार लगावत चेन्नईला विजयाच्या अधिक जवळ आणले. शिवम दुबेने २८ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह ३७ धावा केल्या, तर जडेजाने १७ चेंडूत एका षटकारासह २५ धावा केल्या.

Maharashtra Kesari 2025 Kustigir Parishad Offical Sandip Bhondave Statement on Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad
Maharashtra Kesari 2025: “रिप्लेमध्ये दिसतंय पंचांचा निर्णय चुकलाय पण…”, महाराष्ट्र केसरीमधील वादानंतर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मोठं वक्तव्य
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam 2025: ‘एमपीएससी’ परीक्षेसाठी मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही, पोलीस आणि…
Jasprit Bumrah and Smriti Mandhana likely get Award for Best International Cricketer 2023 24 in BCCI Awards
BCCI Awards : BCCI पुरस्कारांमध्ये बुमराह आणि मंधानाचे वर्चस्व, ‘या’ खास पुरस्कारावर नाव कोरण्यासाठी सज्ज
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Varun Chakravarthy 5 Wicket Haul IND vs ENG 3rd T20I Rajkot Watch Video
IND vs ENG: वरूण चक्रवर्तीने ५ विकेट्स घेत घडवला इतिहास, बुमराह-शमी कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
West Indies Beat Pakistan by 120 Runs Records Historic Win at Multan Test After 35 Years
PAK vs WI: वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर ३५ वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय, यजमान स्वत:च्याच जाळ्यात अडकले; सामन्यात नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja 12 wickets help Saurashtra beat Delhi by 10 wickets in Ranji Trophy 2025 Elite Group match
Ranji Trophy 2025 : जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पंतच्या दिल्लीचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा

चेन्नईकडून मिळालेल्या १७४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने सिराजच्या गोलंदाजीवर चौकार मारत दणदणीत सुरूवात केली. ऋतुराजसोबत सलामीसाठी रचिन रवींद्र आला. झटपट धावा करणारा ऋतुराज १५ धावा करत झेलबाद झाला. त्याच्यानंतर रचिनने शानदार फटके खेळत संघाचा डाव पुढे नेला.पण कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर तो ३ षटकार आणि ३ चौकारांसह ३७ धावा करत बाद झाला. यानंतर डॅरिल मिचेल (२७) आणि अजिंक्य रहाणे (२२) जबरदस्त फलंदाजी करत होते पण फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी उतरला. तर त्याच्यासोबत जडेजा संघाचा डाव सावरला आणि थेट विजय मिळवूनच तंबूत परतले.

तत्त्पूर्वी आरसीबी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेचा नवा गोलंदाज मुस्ताफिझूर रहमान गोलंदाजीला येईपर्यंत बंगळुरू संघाचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला. सलामीसाठी आलेल्या फॅफ डू प्लेसिसने संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. त्याने २३ धावांत ८ चौकार मारत ३५ धावा केल्या. पाचव्या षटकात मात्र आरसीबीच्या हातून सामना निसटत असल्याचे दिसले. मुस्तफिझूरच्या षटकात फॅफ (३५) आणि रजत पाटीदार (०) झेलबद झाले. पुढच्याच षटकात चहरने मॅक्सवेलला खाते न उघडताच धोनीकडून झेलबाद केले.

या मोठ्या धक्क्यांनंतर विराट कोहली (२१) आणि कॅमेरून ग्रीन (१८) हे दोघे संघाचा डाव सावरत होते.पण मुस्तफिझूरने त्यांना बराच काळ मैदानात टिकू दिले नाही. १२व्या षटकात विराटला झेलबाद करताना रचिन आणि रहाणेने अफलातून झेल टिपला. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर ग्रीनला क्लीन बोल्ड केले. या विकेटनंतर आरसीबी संघ पूर्णपणे कोलमडला असे वाटले, पण नंतर आलेल्या दिनेश कार्तिक आणि अनुज रावत यांनी ५ बाद ७९ धावांपासून १७३ धावसंख्येपर्यंत पोहोचवला.

अनुज रावतने सामन्याचा रोख बदलत २५ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटाकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. पहिला डाव संपल्याने त्याचे अर्धशतक हुकले पण संघासाठी निर्णायक क्षणी महत्त्वाची इनिंग तो खेळला. तर दिनेश कार्तिकसुध्दा मोक्याच्या वेळी पुन्हा एकदा संघासाठी संकटमोचक ठरला, त्याने २६ चेंडूक २ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३८ धावा केल्या.

Story img Loader