CSK vs KKR Highlights, IPL 2024 :आयपीएल २०२४ च्या २२ व्या सामन्यात चेन्नविरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघाला यंदाच्या पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाला चेन्नईने तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर रोखले. यानंतर प्रत्युत्तरात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १७.४ षटकांत ३ गडी गमावत १४१ धावा करून सामना जिंकला. अशा प्रकारे मागील दोन सामन्यातील पराभवानंतर विजय ट्रॅकवर पुनरागमन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

CSK vs KKR Highlights, IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १९ सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आहे.

19:12 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तिक्षना.

कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

19:08 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : कोलकाताविरुद्ध नाणेफेक जिंकून चेन्नईचा गोलंदाजीचा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचा कर्णधार गायकवाड म्हणाला की, वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना या सामन्यासाठी उपलब्ध नाही आणि मुस्तफिझूर रहमान परतला आहे. तसेच शार्दुल ठाकूर आणि समीर रिझवी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, केकेआरने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

18:48 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : विजयी ‘चौकार’ मारण्याचे केकेआरचे लक्ष्य असेल

या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने तीन सामने खेळले आणि सर्व सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत आज श्रेयस अय्यरचा संघ चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयाचा ‘चौकार’ मारण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार असून या सामन्याची नाणेफेक सात वाजता पार पडणार आहे.

18:32 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करणे कठीण

चेपॉकमध्ये चेन्नईला पराभूत करणे केकेआरसाठी कठीण काम असू शकते. या मैदानावर आतापर्यंत चेन्नई आणि केकेआर यांच्यात १० वेळा सामना झाला आहे. या कालावधीत चेन्नईने सात वेळा विजय मिळवला आहे. तर कोलकाताने केवळ तीन सामने जिंकले आहेत.

18:14 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : दीपक चहरच्या खांद्यावर सीएसकेच्या गोलंदाजीची धुरा

रहमान आणि पाथिराना बाहेर राहिल्यास वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दीपक चहर, तुषार देशपांडे आणि मुकेश चौधरी यांच्या खांद्यावर असेल. त्याचबरोबर फिरकी विभागात मोईन अली, रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर जबाबदारी असेल. नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिले आहेत. दोन्ही संघांना फलंदाजीच्या निर्भय कामगिरीचा फायदा झाला आहे.

17:44 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : सीएसकेसमोर सुनील नरेनला रोखण्याचे आव्हान

सुनील नरेनने डावाची सुरुवात करणे केकेआरसाठी फायदेशीर ठरत आहे. केकेआरचा चालू हंगामातील सर्वात यशस्वी फलंदाज नरेनला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवणे सीएसकेच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल. फिल सॉल्टनेही डावाची सुरुवात करताना नरेनला चांगली साथ दिली आहे. मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर आणि रमणदीप सिंगला अधिक सातत्य दाखवावे लागेल, तर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंग यांनी आतापर्यंत प्रभाव पाडला आहे.

17:38 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा आहे.

आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १८ सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आहे.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएल २०२४च्या हंगामात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा विजयरथ रोखला.