CSK vs KKR Highlights, IPL 2024 :आयपीएल २०२४ च्या २२ व्या सामन्यात चेन्नविरुद्धच्या सामन्यात कोलकाता संघाला यंदाच्या पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता संघाला चेन्नईने तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर रोखले. यानंतर प्रत्युत्तरात कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर १७.४ षटकांत ३ गडी गमावत १४१ धावा करून सामना जिंकला. अशा प्रकारे मागील दोन सामन्यातील पराभवानंतर विजय ट्रॅकवर पुनरागमन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Live Updates

CSK vs KKR Highlights, IPL 2024 : आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध चेन्नईचा वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १९ सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आहे.

23:15 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : ऋतुराजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सीएसकेचा शानदार विजय, केकेआरवर ७ विकेट्सनी केली मात

आयपीएल २०२४ च्या २२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. चेपॉकमध्ये झालेल्या या सामन्यात केकेआर संघ प्रथम खेळून केवळ १३७ धावा करू शकला. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत केवळ तीन विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. चेन्नईसाठी, प्रथम रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी केली. गायकवाडने ५८ चेंडूत नाबाद ६७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर शिवम दुबेने १८ चेंडूत २८ धावा केल्या. चेन्नईचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे, तर केकेआरचा पहिला पराभव आहे.

22:59 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : शिवम दुबे पॅव्हेलियनमध्ये परतला

शिवम दुबेला बाद करून वैभव अरोराने केकेआरला तिसरे यश मिळवून दिले. शिवम दुबे १८ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. शिवम बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी क्रीजवर आला. सीएसकेला विजयासाठी १९ चेंडूत तीन धावा करायच्या आहेत. धोनी ऋतुराज गायकवाडसोबत क्रीजवर उपस्थित आहे.

22:47 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या शंभरी पार

१४ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या २ बाद १०९ धावा आहे. आता चेन्नईला विजयासाठी ३६ चेंडूत केवळ २९ धावा करायच्या आहेत. ऋतुराज गायकवाड ५२ चेंडूत ५८ धावांवर खेळत आहे. त्याने आतापर्यंत ८ चौकार मारले आहेत. तसेच शिवम दुबे पाच चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.

22:37 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : डॅरिल मिशेल पॅव्हेलियनमध्ये परतला

केकेआरचा फिरकीपटू सुनील नरेनने डॅरिल मिशेलला बाद करून सीएसकेला दुसरा धक्का दिला. मिशेल १९ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. मात्र, सीएकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ४८ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित असून शिवम दुबे नवा फलंदाज म्हणून क्रीजवर आला आहे.

22:34 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : ऋतुराज गायकवाडने झळकावले यंदाच्या हंगामातील पहिले अर्धशतक

१२ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या एका विकेटवर ९६ धावा आहे. गायकवाड ४६ चेंडूंत सात चौकारांसह ५१ धावांवर खेळत आहे. तर डेरिल मिशेल १८ चेंडूत २५ धावांवर खेळत आहे. आता चेन्नईला विजयासाठी ४८ चेंडूत फक्त ४२ धावा करायच्या आहेत.

22:30 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : मिचेल आणि गायकवाड सहज धावा काढत आहेत

ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल अगदी सहज धावा करत आहेत. चेन्नईची धावसंख्या ११ षटकात एका विकेटवर ८९ धावा झाली आहे. गायकवाड ४२ चेंडूत सात चौकारांसह ४७ धावा तर डॅरिल मिशेल १६ चेंडूत २२ धावांवर खेळत आहे. आता चेन्नईला विजयासाठी ५४ चेंडूत फक्त ४९ धावा करायच्या आहेत.

https://twitter.com/IPL/status/1777379234924876055/photo/1

22:24 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : गायकवाड-मिशेलने सावरला चेन्नई सुपर किग्जचा डाव

९ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एका विकेटवर ७४ धावा आहे. कर्णधार गायकवाड ३३ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे. त्याने ६ चौकार मारले आहेत. तर डॅरिल मिशेल १३ चेंडूत २० धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आहे.

22:11 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : मिशेलने नरेनच्या षटकात लगावले चौकार-षटकार

सुनील नरेनने सातवे षटक टाकले. या षटकात डॅरिल मिशेलने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. ७ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एका विकेटवर ६६ धावा आहे. कर्णधार गायकवाड २५ चेंडूत ३३ धावांवर खेळत आहे. त्याने ६ चौकार मारले आहेत. त्याच्यासोबत डॅरिल मिशेल ९ चेंडूत १६ धावांवर खेळत आहे. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला आहे.

https://twitter.com/sha_hid695/status/1777375327280574885

22:08 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : सीएसकेने ५० धावांचा टप्पा ओलांडला

पॉवरप्लेअखेर चेन्नई सुपर किंग्जने ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. सहा षटकांनंतर, सीएसकेची धावसंख्या एका विकेटवर ५२ धावा आहे आणि डॅरिल मिशेल कर्णधार ऋतुराज गायकवाडसह क्रीजवर उपस्थित आहे. पॉवरप्लेदरम्यान रचिन रवींद्रला बाद करून केकेआरने सीएसकेला मोठा धक्का दिला.

22:03 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : पाच षटकांनंतर सीएसकेची धावसंख्या १ बाद ४१ धावा

पाच षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एका विकेटवर ४१ धावा आहे. अंकुल रॉयने पाचवे षटक टाकले. गायकवाडने या षटकात तीन चौकार मारले. गायकवाडने १९ चेंडूत २३ धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत डॅरिल मिशेल तीन चेंडूत एका धावेवर आहे.

https://twitter.com/DhoniAK2/status/1777374052870725696

21:55 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का! वैभव अरोराने रचिन रवींद्रला केले झेलबाद

केकेआरचा गोलंदाज वैभव अरोराने सीएसकेचा सलामीवीर रचिन रवींद्रला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. आठ चेंडूत १५ धावा करून रचिन बाद झाला. आता कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल क्रीझवर उपस्थित आहे.

21:52 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : स्टार्कच्या षटकात १५ धावा आल्या

मिचेल स्टार्कनेही तिसरे षटक टाकले. या षटकात रचिन रवींद्रने तीन चौकार मारले. या षटकात एकूण १५ धावा आल्या. ३ षटकांनंतर चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या एकही विकेट न घेता २६ धावा आहे.

21:42 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : रचिन-ऋतुराजकडून चेन्नई सुपर किंग्जच्या डावाला सावध

मिचेल स्टार्कने पहिल्या षटकात केवळ चार धावा दिल्या. रचिन रवींद्र एका चेंडूवर एका धावेवर आहे. कर्णधार गायकवाड पाच चेंडूत दोन धावांवर आहे. चेन्नईसमोर १३८ धावांचे लक्ष्य आहे.

21:23 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : केकेआरने सीएसकेला दिले १३८ धावांचे लक्ष्य, जडेजा-तुषारने प्रत्येकी तीन बळी घेतले

फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर रोखले. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय सुनील नरेनने २० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या, तर त्याने आंगक्रिश रघुवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

रघुवंशीने १८ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २४ धावांचे योगदान दिले. केकेआरसाठी नरेन आणि रघुवंशी यांच्यात केवळ अर्धशतकी भागीदारी झाली आणि ही भागीदारी तुटल्यानंतर केकेआरची फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि शेवटपर्यंत पुनरागमन करू शकले नाही.

21:16 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : कर्णधार श्रेयस अय्यर ३४ धावा काढून बाद

केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करून मुस्तफिझूर रहमानने सीएसकेला आठवे यश मिळवून दिले. अय्यरचा झेल जडेजाने घेतला. याचबरोबर जडेजाने आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले. केकेआरची फलंदाजी पूर्णपणे ढासळली आहे. डाव संपायला फक्त चार चेंडू बाकी आहेत. अनुकुल रॉयसोबत मिचेल स्टार्क क्रीजवर आहे.

21:11 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : तुषार देशपांडेने सीएसकेला सातवे यश मिळवून दिले

वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांनी चमकदार कामगिरी सुरू ठेवत सीएसकेला सातवे यश मिळवून दिले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आंद्रे रसेल बाद झाला. तो १० चेंडूत १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. केकेआरने अनुकुल रॉयला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवले आहे. त्याच्यासोबत श्रेयस अय्यर क्रीझवर उपस्थित आहे.

https://twitter.com/37of16/status/1777359949389295917

21:07 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : १८ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या ६ विकेटवर १२२ धावा

१८ षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या ६ विकेटवर १२२ धावा आहे. श्रेयस अय्यर २९ चेंडूत २९ धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार मारले आहेत. त्याच्यासोबत आंद्रे रसेल आठ चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.

20:59 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : तुषार देशपांडेने केकेआरला दिला सहावा धक्का! रिंकू सिंगला केले क्लीन बोल्ड

१७व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तुषार देशपांडेने रिंकू सिंगला बोल्ड केले. रिंकूला १४ चेंडूत केवळ ९ धावा करता आल्या. खेळपट्टी बऱ्यापैकी संथ आहे. येथे फलंदाजी करणे कठीण होत आहे. आता आंद्रे रसेल कर्णधार श्रेयस अय्यरसोबत क्रीजवर आहे.

https://twitter.com/TheMSDians/status/1777357946902757802

20:53 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : खूप कालावधीनंतर आला चौकार

केकेआरची अवस्था अत्यंत वाईट आहे. अतिशय संथ गतीने धावा केल्या जात आहेत. श्रेयस अय्यरने १६व्या षटकात शार्दुल ठाकूरवर चौकार मारला. १६ षटकांनंतर ५ विकेटवर १०९ धावा. श्रेयस अय्यर २७ चेंडूत २६ धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार मारले आहेत. त्याच्यासोबत रिंकू सिंग ११ चेंडूत ७ धावांवर खेळत आहे.

20:43 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : १४ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या ५ विकेटवर ९४ धावा

१४ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या ५ विकेटवर ९४ धावा आहे. श्रेयस अय्यर १९ चेंडूत १६ धावांवर खेळत आहे. त्याने चौकार मारला आहे. त्याच्यासोबत रिंकू सिंग सहा चेंडूत तीन धावांवर खेळत आहे. केकेआरला कसशी तरी धावसंख्या १५० पार पोहोचवायची आहे.

20:33 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : कोलकाताने गमावली पाचवी विकेट

१२व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केकेआरची पाचवी विकेट पडली. प्रथम रमणदीप सिंगने महिषा तीक्षनाला षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्याला महिषा क्लीन बोल्ड केलेआता श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग क्रीजवर आहेत.

20:26 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : १० षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या ४ विकेटवर ७० धावा

१० षटकांनंतर कोलकाताची धावसंख्या ४ विकेटवर ७० धावा आहे. श्रेयस अय्यर सात चेंडूत पाच धावांवर तर रमणदीप सिंग सहा चेंडूत चार धावांवर खेळत आहे. रवींद्र जडेजाने केकेआरच्या धावसंख्येवर अंकुश लावला आहे. कारण फिरकीपटूंना खेळपट्टीक़डून मदत मिळत आहे.

20:17 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : केकेआरचा डाव अडखळला, जडेजाने सीएसकेला मिळवून दिले चौथे यश, व्यंकटेश बाद ३ धावांवर बाद

रवींद्र जडेजाने केकेआरचा डाव उद्ध्वस्त केला आहे. जडेजाने व्यंकटेश अय्यरला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. केकेआरने अवघ्या ६४ धावांवर ४ विकेट गमावल्या. या सामन्यातील जडेजाची ही तिसरी विकेट आहे.

20:12 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : जडेजाने केकेआरला एका षटकात दिले दोन धक्के

रवींद्र जडेजाने सातव्या षटकात कोलकाताला दोन धक्के दिले. प्रथम जडेजाने शानदार फलंदाजी करणाऱ्या अंगक्रिश रघुवंशीला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि त्यानंतर सुनील नरेनला बाऊंड्रीवर झेलबाद केले. रघुवंशी १८ चेंडूत २४ आणि सुनील नरेनने २० चेंडूत २७ धावा केल्यावर बाद झाला. सात षटकांनंतर केकेआरची धावसंख्या ३ विकेटवर ६१ धावा आहे.

20:06 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : केकेआरची दुसरी विकेट पडली

सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने कोलकाताला दुसरा धक्का दिला. १८ चेंडूत २४ धावा करून रघुवंशी बाद झाला. त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि एक षटकार आला. आता श्रेयस अय्यर फलंदाजीला आला आहे.

20:03 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : पॉवरप्लेच्या षटकांत नरेन-रघुवंशीने कुटल्या ५६

सहा षटकांनंतर केकेआरची धावसंख्या एका विकेटवर ५६ धावा आहे. सुनील नरेन १८ चेंडूत २६ धावांवर खेळत आहे. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याच्यासोबत रघुवंशी २४ चेंडूत १७ धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे.

19:58 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : नरेन-रघुवंशीकडून शार्दुल ठाकुरची धुलाई

४ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या एका विकेटवर ३७ धावा आहे. या षटकात शार्दुल ठाकूरने ११ धावा दिल्या. सुनील नरेन १२ चेंडूत २० धावांवर खेळत आहे. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला आहे. त्याच्यासोबत रघुवंशी ११ चेंडूत १२ धावांवर खेळत आहे.

19:51 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : सुनील नरेनने तुषार देशपांडेंच्या दुसऱ्या षटकांत पाडला धावांचा पाऊस

तुषार देशपांडेने तिसरे षटक टाकले. या षटकात एकूण १९ धावा आल्या. ३ षटकांनंतर केकेआरची धावसंख्या एका विकेटवर २६ धावा आहे. सुनील नरेन १० चेंडूत १५ धावांवर खेळत आहे. त्याने दोन चौकार आणि एक षटकार मारला आहे. त्याच्यासोबत आंगक्रिश रघुवंशी सात चेंडूत सहा धावांवर खेळत आहे.

19:44 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : दोन षटकानंतर केकेआरची धावसंख्या १ बाद ७ धावा आहे

तुषार देशपांडेने पहिले षटक टाकले. एका षटकानंतर केकेआरची धावसंख्या एका विकेटवर एक धाव आहे. फिल सॉल्ट पहिल्याच षटकात शून्यावर झेलबाद झाला. मुस्तफिजुर रहमानने दुसरे षटक टाकले. या षटकात एक चौकार आला. आता दोन षटकांनंतर केकेआरची धावसंख्या एका विकेटवर सात धावा आहे. आंगक्रिश रघुवंशी सात चेंडूत ६ धावांवर तर सुनील नरेन पाच चेंडूत एका धावेवर खेळत आहे.

19:35 (IST) 8 Apr 2024
CSK vs KKR : पहिल्याच चेंडूवर केकेआरला मोठा धक्का, फिलिफ सॉल्ट शून्यावर बाद

केकेआर संघाला डावाच्या पहिल्या चेंडूवर मोठा धक्का बसला. तुषार देशपांडेने पहिल्या चेंडूवर फिलिप सॉल्टला जडेजाच्या हाती झेलबाद केले.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएल २०२४च्या हंगामात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा विजयरथ रोखला.