CSK vs KKR, IPL 2024 : आयपीएल २०२४ मधील २२ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीएसकेने कर्णधार ऋतुरात गायकवाडच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचा ७ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १३७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे सीएसकेने १७.४ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजीनंतर चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार ऋतुराजने ५८ चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने खेळलेल्या ६७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर केकेआरचा ७ गडी राखून पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर, सीएसके आपल्या घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर परतले. त्याचबरोबर केकेआरला या हंगामात पहिला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने २० षटकांत ९ गडी गमावून १३९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत ३ गडी गमावत १४१ धावा करून सामना जिंकला.

सीएसकेच्या विजयात रचिन रवींद्रने १५ आणि डॅरिल मिशेलने २५ धावांचे योगदान दिले. चेन्नईने पहिल्या १० षटकात १ गडी गमावून ८१ धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यासाठी विजय मिळवणे सोपे झाले. कारण संघाला शेवटच्या १० षटकात ५७ धावा हव्या होत्या आणि त्यांच्या ९ विकेट्स शिल्लक होत्या.

हेही वाचा – IPL 2024 : वीरेंद्र सेहवागला राजस्थानच्या ‘या’ खेळाडूला विश्वचषक खेळताना पाहायचंय; म्हणाला, “तो टी-२० क्रिकेटचा महान…”

१३ व्या षटकात मिशेल बाद झाला असला, तरी त्यानंतर प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने नेहमी प्रमाणे तुफानी शैलीत फलंदाजी करत सामना एकतर्फी केला. शिवम दुबेने १८ चेंडूत २८ धावांच्या स्फोटक खेळीत १ चौकार आणि ३ षटकार ठोकले. केकेआरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मिचेल स्टार्कची पुन्हा एकदा धुलाई झाली. सुनील नरेन आणि वैभव अरोरा यांच्याशिवाय केकेआरच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.

तत्पूर्वा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ९ बाद १३७ धावांवर रोखले. केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने ३४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय सुनील नरेनने २० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या, तर त्याने अंगक्रिश रघुवंशीसह दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. केकेआरच्या इतर फलंदाजांनी निराशा केली.