CSK vs RCB Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा ६ विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने ८ चेंडू राखून आणि ६ गडी राखून लक्ष्याचा पाठलाग केला. चेन्नईकडून रचिन रवींद्रने ३७, अजिंक्य रहाणेने २७ धावा, शिवम दुबेने नाबाद ३४ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २५ धावा केल्या. तत्पूर्वी, गोलंदाजीत चेन्नईकडून मुस्तफिजुर रहमानने चार विकेट्स घेतल्या.

Live Updates

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुचा ६ विकेटने पराभव केला. यासह चेन्नईने नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली विजयाने सुरुवात केली.

19:49 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आरसीबीने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या नाणेफेक पार पडली आहे. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

19:23 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : एआर रहमानने सादर केले ‘जय हो’ गाणे

एआर रहमाननेही संपूर्ण टीमसोबत जय हो गाण्यावर परफॉर्म केले. या गाण्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. या गाण्यासोबत रहमान, मोहित चौहान आणि नीती मोहन यांचा समावेश असलेल्या बँडचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर उद्घाटन सोहळा संपला.

18:56 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : अक्षय कुमारने देसी बॉईजच्या गाण्यावर धरला ठेका

अक्षय कुमारने देसी बॉईजच्या ‘सुबह होने ना दे’ या गाण्यावर परफॉर्म केले. त्यानंतर त्यांनी भूल भुलैया या गाण्यावरही डान्स केला. पार्टी ऑल नाईट या गाण्यावरही सादरीकरण केले. चुरा के दिल मेरा गोरिया चली या गाण्यावर सादरीकरण केले.

18:41 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : बॉलिवूडच्या गाण्यांवर स्टार्स थिरकणार

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ व्यतिरिक्त प्रसिद्ध गायक ए आर रहमान आणि सोनू निगम हे देखील उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. देशभक्तीपर गाण्यांव्यतिरिक्त एआर रहमान आणि सोनू निगम बॉलीवूड गाण्यांनी वातावरण मनोरंजक बनवतील, तर अक्षय आणि टायगरची ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ ही जोडीही परफॉर्म करेल. गेल्या वर्षी रश्मिका मंधाना, तमन्ना भाटिया आणि अरिजित सिंग यांनी आयपीएलच्या उद्घाटन समारंभात आपल्या परफॉर्मसने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते.

17:53 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : शार्दुल-तुषार सीएसकेसाठी महत्त्वाचे ठरू शकतात

चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू बऱ्याच दिवसांपासून सराव करत आहेत. शार्दुल ठाकूरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तुषार देशपांडेने गेल्या मोसमात अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळीही सीएसकेला त्याच्याकडून अपेक्षा असतील. हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही संघासाठी महत्त्वाचे योगदान देऊ शकतात.

17:37 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : एमए चिदंबरम स्टेडियमवरील प्रत्येक सामन्यात ३१४.०१ च्या सरासरीने धावांचा पाऊस

एमए चिदंबरम स्टेडियमवर आतापर्यंत ७७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत. यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४७ सामने जिंकले असून पाठलाग करणाऱ्या संघाने ३० सामने जिंकले आहेत. एकूण ७७ आयपीएल सामन्यांमध्ये (दोन्ही डावातील धावांसह), १८११४ चेंडूत २४१७९ धावा प्रति सामना ३१४.०१ च्या सरासरीने आणि १३३.४ च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. एमए चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या २४६ धावा आणि सर्वात कमी धावसंख्या ७० धावांची आहे.

17:12 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सायंकाळी साडेसहाला सुरु होणार ओपनिंग सेरेमनी

आयपीएलच्या १७व्या हंगामाची सुरुवात चांगली होणार आहे. यासाठी आयोजकांनी बरीच तयारी केली असून त्यात अनेक बॉलीवूड कलाकार आणि गायक आपल्या परफॉर्मन्सने उपस्थित प्रेक्षकांना आणि खेळाडूंना मंत्रमुग्ध करतील. सामन्यापूर्वीचा हा रंगतदार कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता सुरू होणार असून सुमारे अर्धा तास चालणार आहे.

16:48 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : चेन्नईच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

चेन्नईत राहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. चेपॉक स्टेडियमवर आज रात्रीपासून आयपीएल सामन्यासाठी चेन्नई मेट्रोने रात्री ११ च्या पुढे सेवा वाढवली आहे. चाहत्यांची सोय लक्षात घेऊन आणि गर्दी टाळण्यासाठी चेन्नई मेट्रोने मेट्रो ट्रेनची वेळ २२ मार्च रोजी रात्री ११ ऐवजी १ वाजेपर्यंत वाढवली आहे.

16:27 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी चेन्नईसाठी आनंदाची बातमी

मथीशा पाथिरानाचे व्यवस्थापक अमिला कलुगालगे यांनी अधिकृत एक्स खात्यावर पाथीरानाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. ते म्हणाले, की मथीशा पाथिराना तंदुरुस्त असून मैदानात परतण्यास तयार आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान पाथिरानाला दुखापत झाली होती. पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्रस्त होता, ज्यामुळे तो बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेसाठी वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळू शकला नाही.

16:06 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आयपीएल ओपनिंग सेरेमनीला अक्षय कुमारसह अनेक कलाकार करणार परफॉर्मन्स

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ ची ओपनिंग सेरेमनी २२ मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सेरेमनीला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारखे स्टार्सची उपस्थिती आणि त्यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करण्यासाठी ए.आर. रहमान आणि सोनू निगम ही या सेरेमनीसाठी चेन्नईमध्ये असतील.

15:50 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सीएसकेने गेल्या पाचपैकी चार सामन्यात आरसीबीला चारलीय धूळ

आरसीबीविरुद्ध सीएसकेची कामगिरी किती उत्कृष्ट आहे याचा अंदाज यावरून लावता येतो की, २०२१ ते २०२३ या कालावधीत दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी सीएसकेने चार सामने जिंकले आहेत, तर आरसीबीने एक सामना जिंकला आहे. २०२१ च्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले आणि धोनीच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये विजय नोंदवण्यात यश आले. यानंतर, २०२२ मध्ये देखील, सीएसके आणि आरसीबी यांच्यात दोन सामने खेळले गेले, त्यापैकी एक सामना सीएसकेने जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात आरसीबी विजय मिळवण्यात यशस्वी झाला. गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता आणि या सामन्यात सीएसकेने आरसीबीचा आठ धावांनी पराभव केला होता.

15:30 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : आकडेवारीत सीएसकेचा वरचष्मा

आयपीएल इतिहासात सीएसके आणि आरसीबी यांच्यात आतापर्यंत एकूण ३१ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये गतविजेत्या सीएसकेने २० सामने जिंकले आहेत, तर आरसीबी संघ फक्त १० सामने जिंकू शकला आहे. दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. अशाप्रकारे आरसीबीच्या तुलनेत धोनीचा संघ वरचढ असल्याचे दिसते. मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये एका चेंडूने खेळ बदलतो, त्यामुळे या फॉरमॅटमध्ये कोणता संघ सामना जिंकू शकतो हे सांगणे कठीण आहे.

15:12 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सलामीच्या सामन्यात दोन्ही संघांचा विक्रम कसा आहे?

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आठ वेळा हंगामातील सलामीचा सामना खेळला आहे. यातील संघाने चार सामने जिंकले आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचे चार सलामीचे सामने खेळले आहेत. यातील संघ तीन सामने हरला आहे, तर आरसीबीने एक सामना जिंकला आहे. आयपीएल २०२१ मध्ये बंगळुरूने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.

14:53 (IST) 22 Mar 2024
CSK vs RCB : सलामीच्या सामन्यापूर्वी पार पडणार रंगतदार उद्घाटन सोहळा

आता आयपीएलचा १७वा सीझन सुरू होण्यास थोडाच अवधी शिल्लक आहे. स्पर्धेची सुरुवात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यातील सामन्याने होईल. आयपीएलच्या थरारासाठी क्रिकेट चाहते वर्षभर वाट पाहत असले तरी त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. रोमांचक सामन्यांव्यतिरिक्त, आयपीएल उद्घाटन समारंभासाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथे टीव्ही स्टार्स प्रत्येक वेळी आपली जादू पसरवतात. यावेळीही आयपीएलच्या रंगतदार सुरुवातीसाठी आयोजकांनी धमाकेदार तयारी केली आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सारखे बॉलिवूड कलाकार थिरकताना दिसणार आहेत.

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2024 : आयपीएल २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने आरसीबीचा ६ विकेट्सने पराभव केला. चेन्नईने १७४ धावांचे लक्ष्य ८ चेंडू राखून पूर्ण केले.