Mayank Yadav Appreciated by Dale Steyn : मयंक यादव आयपीएलमधील नवीन वेगवान सनसनाटी म्हणून उदयास आला आहे. २१ वर्षीय वेगवान गोलंदाजाचा आदर्श खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन आहे. मयंकने लखनऊ सुपरजायंट्सकडून पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना पदार्पण केले. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच मयंकने आयपीएलमधील हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकून दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा आदर्श डेल स्टेनने स्वतः मयंकचे कौतुक करताना म्हणाला इतके दिवस तू कुठे होतास? ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली देखील त्याचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल २०२४ मधील पंजाबविरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादवने सर्वात वेगवान चेंडू टाकला. त्याने पंजाब किंग्जच्या डावातील १२ व्या षटकात ताशी १५५.८ च्या वेगाने चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर मयंकने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा यांना आपले बळी बनवले. मयंकची वेगवान गोलंदाजी पाहून डेल स्टेनने त्याचे कौतुक केले. डेल स्टेनने एक्सवर एक पोस्ट शेअर करताना लिहले, ‘१५५.८ केपीएच… मयंक यादव, तू कुठे लपला होतास!’

या सामन्यात त्याने ताशी १५० किमीपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत पंजाबच्या जबड्यातून सामना हिसकावून घेतला. या उत्कृष्ट कामगिरीसाठी मयंकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यानंतर जेव्हा मयंकला विचारण्यात आले की, तुझा आदर्श खेळाडू कोण आहे, तेव्हा तो म्हणाला की भारतीय खेळाडू नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा त्याचा आदर्श खेळाडू आहे. मयंकने या सामन्यात १५५.८ प्रतितास वेगाने चेंडू शिखर धवनला टाकला होता.

हेही वाचा – LSG vs PBKS : बुमराह किंवा शमीला नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मयंक यादव मानतो आपला आदर्श

मयंकच्या रूपाने भारताला सर्वात वेगवान गोलंदाज मिळाला –

मयंक यादव २०२२ पासून लखनौ सुपरजायंट्समध्ये आहे. पण गेल्या मोसमात सरावाच्या वेळी त्याला दुखापत झाली, त्यानंतर तो खेळू शकला नाही. त्याला सुपरजायंट्सने २० लाखांच्या मूळ किमतीत करारबद्ध केले. ब्रेट लीने मयंक यादवची स्तुती करताना लिहिले, ‘भारताला सर्वात वेगवान गोलंदाज मिळाला आहे.’

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने लिहिले, ‘मयंक यादव ताशी १५५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करत असून इयान बिशप आनंदित होईल.’

हेही वाचा – IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

मयंकला टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळू शकते – सुरेश रैना

टीम इंडियाचा मधल्या फळीतील माजी फलंदाज सुरेश रैनाने तर मयंक यादव आगामी टी-२० विश्वचषक संघात स्थान मिळवू शकतो, असे म्हटले आहे. रैनाने म्हणाला की, “मयंक यादव ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यामुळे तो भारतीय टी-२० विश्वचषकाच्या संघातही स्थान मिळवू शकतो.” मयंक दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने अलीकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 dale steyn suresh raina and brett lee praise mayank yadav for bowling record 155 point 8 kmph against pbks vbm