List of Mahendra Singh Dhoni’s records : आयपीएल २०२४च्या हंगामातील सामना रविवारी विशाखापट्टणम येथे पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदवला. यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनी या सामन्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्याची ही एक इनिंग खूप चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील दिल्ली कॅपिटल्सच्या विजयापेक्षा धोनीची फलंदाजीच जास्त चर्चा आहे. कारण माहीने १६ चेंडूत नाबाद ३७ धावांची खेळी साकारत अनेक विक्रमाला गवसणी घातली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेंद्रसिंग धोनीने एका सामन्यात रचले पाच विक्रम –

विशाखापट्टणममध्ये झालेल्या या सामन्यात पाच मोठे नवीन विक्रम आपल्या नावावर केले. पहिला विक्रम, टी-२० मध्ये ७००० धावा पूर्ण करणारा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला. दुसरा विक्रम, धोनीने भारतीयांमध्ये एका षटकात सर्वाधिक २० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर तिसरा विक्रम, आयपीएलमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज. चौथा विक्रम, आयपीएलमध्ये १९व्या आणि २०व्या षटकात १०० षटकार पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला. पाचवा विक्रम, टी-२० मध्ये ३०० फलंदाजांना यष्टीच्या मागे बाद करणारा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.

७००० धावा पूर्ण करणारा पहिला आशियाई फलंदाज –

एमएस धोनी टी-२० मध्ये यष्टिरक्षक म्हणून ७००० धावा करणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला. या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (६९६२) आणि कामरान अकमल (६४५४) यांची नावे आहेत.

हेही वाचा – IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

९ वेळा एका षटकांत २० धावा करणारा फलंदाज –

एमएस धोनीने आयपीएलच्या एका डावात ९ वेळा एका षटकांत २० धावा केल्या आहेत, जी सर्वाधिक वेळा आहे. ॲनरिक नॉर्टजेच्या शेवटच्या षटकात त्याने २० धावा केल्या. या यादीत रोहित शर्मा, ऋषभ पंत, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्या यांच्या नावांचा समावेश आहे. रोहित शर्माने ८, ऋषभ पंतने ६ धावा, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ५ वेळा २० धावा केल्या आहेत.

आयपीएलमध्ये यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून ५००० धावा करणारा पहिला फलंदाज –

एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून ५००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या यादीत ४२३३ धावांसह दिनेश कार्तिक, ३०११ धावांसह रॉबिन उथप्पा, २८१२ धावांसह क्विंटन डी कॉक आणि २७३७ धावांसह ऋषभ पंत यांचा समावेश आहे.

हेही वाचा – MI vs RR Match Preview: मुंबईसमोर राजस्थानचे आव्हान, MI च्या संघात कोणते बदल होणार? पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

१९व्या आणि २०व्या षटकात १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज –

एमएस धोनी आयपीएलच्या एका डावाच्या १९व्या आणि २०व्या षटकात १०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला. किरॉन पोलार्ड ५७, एबी डिव्हिलियर्स ५५, हार्दिक पंड्या ५५, आंद्रे रसेल ५१ आणि रवींद्र जडेजा ४६ षटकारांसह या यादीत सामील आहेत.

३०० फलंदाजांना बाद करणारा पहिला यष्टीरक्षक –

एमएस धोनीने पृथ्वी शॉचा एक सोपा झेल घेतला आणि टी-२० क्रिकेटमध्ये ३०० फलंदाजांना बाद (कॅच + स्टंप) करणारा पहिला यष्टिरक्षक बनला. चेन्नई सुपर किंग्जच्या दिग्गज खेळाडूने दिनेश कार्तिक आणि क्विंटन डी कॉकसारख्या दिग्गजांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 dc vs csk mahendra singh dhoni created five new records against delhi capitals vbm