IPL 2024, Delhi Capitals vs Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने चेन्नईचा विजयरथ रोखला. चेन्नईने सलग २ सामने जिंकले होते, पण चेन्नईचा संघ दिल्लीविरुद्ध कामगिरी करण्यात अपयशी ठरला. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जचा २० धावांनी पराभव करत यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला. दिल्लीने सामना जिंकला असला तरी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला सामना संपल्यानंतर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दिल्ली संघाने शानदार कामगिरी करत विजय तर मिळवला पण हा विजय संघाला चांगलाच भारी पडला आहे. कारण विजयानंतर पंतला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला. षटकांची गती न राखल्याबद्दल कारवाई पंतला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच मोसमात गुजरात संघाचा कर्णधार शुभमन गिललाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला होता. विशेष म्हणजे गिलवरही चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा दंड ठोठावण्यात आला होता. माहीने या सामन्यात १६ चेंडूत ३७ धावांची खेळी केली आहे. ४२ वर्षीय धोनीच्या बॅटमधून ४ चौकार आणि ३ षटकारांची शानदार खेळा पाहायला मिळाली.
दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील हा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात चाहत्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. एक म्हणजे ऋषभ पंतला पुनरागमनानंतर स्फोटक खेळी खेळताना पाहणे आणि दुसरं म्हणजे धोनीची फलंदाजी. गुरू-शिष्याच्या या जोडीने चाहत्यांसाठी या सामन्यात जणू पर्वणीच आणली होती. धोनी आणि पंतचा एकहाती षटकारही दोघे फलंदाजी करताना पाहायला मिळाला. ज्याचे व्हीडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.