IPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला. मुंबईच्या खेळाडूंची झुंज अपयशी ठरली, अखेरच्या षटकांत मुंबईच्या खेळाडूंनी मोठे फटके खेळले पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावाच करू शकला. मुंबईकडून तिलक वर्माने उत्कृष्ट खेळी खेळत ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. दिल्लीकडून रसिख आणि मुकेशने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर खलीलने २ मोठे विकेट घेतले.

दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात चांगली झाली पण पॉवरप्लेमध्येच संघाने ३ विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा ८ धावा तर ईशान २० धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २६ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या २४ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला तर नेहल ४ धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने ४ चेंडूत सात धावा केल्या. तर तिलक वर्माने एका टोकाकडून आपली फलंदाजी सुरू ठेवली पण शेवटच्या षटकात धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत चार चौकार आणि ४ षटकार मारत ६३ धावा केल्या. पियुष चावलाने एक चौकार आणि षटकारासह १० तर वुडने ९ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या. पियुष चावलाने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने फ्रेझरला बाद केले. फ्रेझर २७ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी खेळून बाद झाला. सलामीवीर अभिषेक पोरेल ३६ धावा, शाई होप ४१ धावा, कर्णधार ऋषभ पंत २९ धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स ४८ धावा करत नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून वुड, बुमराह, नबी आणि चावला यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

Live Updates

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights, IPL 2024: मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीच्या घरच्या मैदानावर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईच पराभव करत मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.

19:47 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दिल्लीने घेतला पराभवाचा बदला

मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव करत दिल्लीने मागील पराभवाचा बदला घेतला आहे. मुंबईकडून तिलक वर्मासह खालच्या फळीतील खेळाडूंनी अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजी केली पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ९ बाद २४७ धावाच करू शकला.

19:24 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: टीम डेव्हीड बाद

मुकेश कुमारच्या १८व्या षटकात टीम डेव्हीड झेलबाद झाला. षटकाच्या सुरूवातीच्या तीन चेंडूवर २ षटकार आणि १ चौकार लगावत फटकेबाजी सुरू केली. पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टीम बाद झाला.

19:21 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: मुंबईने गाठला २०० धावांचा पल्ला

टीम डेव्हीड आणि तिलकच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांचा टप्पा गाठला आहे. टीम डेव्हीडने तिलकला चांगली साथ देत संधी मिळताच फटकेबाजी केली आहे.

19:08 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: तिलक वर्माचे शानदार अर्धशतक

तिलक वर्माने सलग दुसरे अर्धशतक झळकावत मुंबईसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण इनिंग खेळली आहे. तिलकने २५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारासह ५० धावा पूर्ण केल्या.

19:05 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

मुंबई इंडियन्सने १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ५ बाद १७३ धावा आहे. मुंबईला विजयासाठी ३० चेंडूत ८५ धावांची गरज आहे. तिलक ४६ धावा तर डेव्हीड ११ धावांवर खेळत आहे.

18:54 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: रसिखच्या एका षटकात २ विकेट्स

रसिखने एकाच षटकात दोन मोठे विकेट्स घेतले आहेत. रसिखने एकाच षटकात दोन मोठे विकेट्स घेतले आहेत. दिल्लीने इम्पॅक्ट खेळाडू म्हणून रसिख दार सलामला सामन्यात आणले आणि एकाच षटकात त्याने इम्पॅक्ट पाडला. त्याने मैदानात सेट झालेल्या कर्णधार पंड्याला झेलबाद केले. पंड्याने २४ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ४६ धावा केल्या.

तर पाचव्या चेंडूवर रसिखने विस्फोटक फलंदाज नेहाल वधेराला बाद केले. ज्याने येताच पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला आणि पुढच्या चेंडूवर ऋषभ पंतने त्याला झेलबाद केले.

18:36 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: तिलक-हार्दिकची जोडी मैदानात

१० षटकांनंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद ११५ धावा आहे. तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या संधी मिळताच फटकेबाजी करताना दिसत आहेत. तिलक २० तर हार्दिक पंड्या ३१ धावांवर खेळत आहे. मुंबईला विजयासाठी ६० चेंडूत १४३ धावांतची गरज आहे.

18:25 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: पॉवरप्लेनंतर मुंबईची धावसंख्या

मुंबईने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ६५ धावा केल्या आहेत. मुंबईचे टॉप-३ फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरले. रोहित शर्मा ३ धावा, इशान किशन २० धावा तर सूर्या २६ धावा करत बाद झाले. सध्या मैदानात तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याची जोडी आहे.

18:22 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: सूर्यकुमारच्या रूपात मुंबईला मोठा धक्का

नेहमीप्रमाणे सूर्याची शानदार फटकेबाजी पहिल्याच चेंडूपासून सुरू होती. पण तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. खलीलच्या सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलकडून झेलबाद झाला. सूर्याने बाद होण्यापूर्वी १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकारांसह २६ धावा केल्या.

18:08 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: रोहितनंतर इशान किशनही बाद

पाचव्या षटकातील मुकेश कुमारच्या पहिल्याच चेंडूवर इशान किशन अक्षर पटेलकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी इशानने १४ चेंडूत ४ चौकारांसह २० धावा केल्या.

18:02 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: रोहित शर्मा झेलबाद

खलील अहमदच्या चौथ्या षटकात रोहित शर्मा झेलबाद झाला आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटवर चेंडू नीट न आदळल्याने रोहित ८ धावा करत बाद झाला. मुंबई संघ सध्या ३५ धावांवर खेळत आहे.

17:46 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: मुंबईच्या डावाला सुरूवात

दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून रोहित-इशानची जोडी मैदानात आहे. विलियम्सने दिल्लीकडून चांगली सुरूवात केली. मुंबईने पहिल्या षटकात १४ धावा केल्या आहेत.

17:23 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दिल्लीने गाठला २५७ धावांचा पल्ला

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २५७ धावा केल्या आहेत. दिल्लीने पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासात २५७ धावांचा आकडा गाठला आहे. जेक फ्रेझरच्या वादळी ८४ धावांच्या खेळीसह दिल्लीच्या या ऐतिहासिक धावसंख्येचा पाया रचला आहे. फ्रेझरने पॉवरप्लेमध्ये ९२ धावांचा आकडा संघाला गाठून दिला. तर अभिषेक पोरेलने त्याला चांगली साथ दिली. जेक फ्रेझरने अवघ्या १५ चेंडूत दिल्लीसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावले. पीयुष चावलाने त्याला झेलबाद केल्याने अवघ्या काही धावांसाठी त्याचे अर्धशतक हुकले.

जेक फ्रेझर बाद झाल्यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होप यांनी संघाचा डाव सावरला. पण नबीच्या गोलंदाजीवर पोरेल २७ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांसह ३६ धावा करत बाद झाला. शाई होपने १७ चेंडूत वादळी फलंदाजी करत ५ षटकारांसह ४१ धावा केल्या. पंत २९ धावा करत बुमराहकडून बाद झाला. तर ट्रिस्टन स्टब्स आपल्या चांगल्या फॉर्मात कायम असून त्याने २५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४८ धावांची खेळी केली. ल्युक वुडच्या एका षटकात त्याने २६ धावा कुटल्या. तर अक्षरने एका षटकारासहित ११ धावा करत नाबाद राहिला.

मुंबईच्या बुमराहसह सर्वच गोलंदाजांची दिल्लीच्या फलंदाजांनी कुटाई केली. जसप्रीत बुमराह, पीयुष चावला, ल्युक वुड आणि मोहम्मद नबीने प्रत्येक एक विकेट घेतली,पण फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही.

17:16 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: ऋषभ पंत बुमराहकडून झेलबाद

१९ व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पंत बुमराहच्या चेंडूवर झेलबाद झाला. बुमराह-पंतच्या लढतीत पुन्हा एकदा बुमराहने बाजी मारत पंतला सातव्यांदा आऊट केले आहे. पंतने १९ चेंडूत २ षटकार, २ चौकारांसह २९ धावा केल्या.

17:11 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: स्टब्सने ल्युक वुडची केली धुलाई

ट्रिस्टन स्टब्सने वुडच्या १८व्या षटकात ५ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा केल्या. यासह स्टब्सने २० चेंडूत ३९ धावा केल्या आहेत. १८ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या ३ बाद २३४ धावा आहे.

17:05 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: पंत स्टब्सची फटकेबाजी सुरू

दिल्लीचे टॉप-५ फलंदाज आज तुफान फॉर्मात असून सध्या मैदानात स्टब्स आणि पंतची जोडी आहे. पंत आणि स्टब्स मिळून मुंबईच्या गोलंदाजांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

16:53 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: १५ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या

दिल्ली कॅपिटल्सने १५ षटकांत १९० धावांचा टप्पा गाठला आहे. दिल्लीच्या टॉप ४ फलंदाजांनी धावांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. सध्या मैदानात ऋषभ पंत २० धावा आणि स्टब्स ४ धावांवर खेळत आहे.

16:43 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: शाई होप झेलबाद

ल्युक वुडची या सामन्यात चांगलीच धुलाई केली आहे. पण १४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने दोन षटकांराच्या धुलाईनंतर तिलक वर्माकरवी झेलबाद केले. होपने १७ चेंडूत ५ षटकारांसह ४१ धावा केल्या.

16:35 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: १० षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या

१० षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या २ बाद १३८ धावा आहे. ऋषभ पंत ३ धावा तर शाई होप १२ धावांवर खेळत आहे.

16:28 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: मुंबई इंडियन्सच्या खात्यात दुसरी मोठी विकेट

मोहम्मद नबीने १०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर आयपीएल २०२४ मधील पहिली विकेट मिळाली. नबीच्या गोलंदाजीवर इशानने अभिषेक पोरेलला झेलबाद केले.

16:11 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: पीयुष चावलाने मिळवून दिली पहिला ब्रेकथ्रु

पीयुष चावलाने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फ्रेझरला झेलबाद केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फ्रेझर सीमारेषेजवळ मोहम्मद नबीकडून झेलबाद झाला. पीयुष चावलाने मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली असून मुंबईवरील निम्मे ओझे हलके केले. फ्रेझरने बाद होण्यापूर्वी २७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह ८४ धाला केल्या आहेत.

16:07 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: पॉवरप्लेमध्येच दिल्लीने गाठला ९२ धावांचा टप्पा

फ्रेझरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने पॉवरप्लेमध्ये ९२ धावा केल्या आहेत. अभिषेक पोरेल ११ धावा तर जेक फ्रेझर ७८ धावांवर खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.

15:57 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: ५ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या

दिल्लीकडून फ्रेझर मॅकगर्कची वादळी फलंदाजी सुरू आहे. फ्रेझरने अवघ्या ५ षटकांत दिल्लीची धावसंख्या बिनबाद ८९ धावांवर खेळत आहे. हार्दिकच्या पाचव्या षटकात फ्रेझरने २० धावा केल्या आहेत.

15:53 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: फ्रेझरचे अर्धशतक

दिल्ली संघाचा विस्फोटक फलंदाज फ्रेझरने अवघ्या १५ चेंडूत शानदार अर्धशतक झळकावले आहे. चौकार-षटकारांच्या आतिषबाजीसह मुंबईच्या सर्व गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे.

15:47 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: फ्रेझर मॅकगर्कची तुफान फटकेबाजी

फ्रेझरने २.४ षटकांतच दिल्लीची धावसंख्या ५० पार नेली आहे. फ्रेझर १४ चेंडूत ४६ धावांवर खेळत आहे. ३ षटकांनंतर दिल्लीची धावसंथ्या ५५ धावा आहे.

15:41 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार

फ्रेझरने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार लगावला तर हा पहिला चेंडूच नो बॉलही ठरला, त्यामुळे फ्री हिट असल्याने पुढच्या चेंडूवर चौकार मिळाला. फ्रेझरने बुमराहच्या षटकातही १८ धावा कुटल्या. २ षटकांनंतर दिल्लीची धावसंख्या ३७ धावा आहे.

15:34 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दिल्लीच्या डावाला सुरूवात

दिल्ली कॅपिटल्सच्या डावाला सुरूवात झाली असून अभिषेक पोरेल आणि फ्रेझर मॅकगर्क सलामीला उतरले आहेत. फ्रेझरने वुडच्या पहिल्याच षटकात चौकार-षटकारांसह १९ धावा कुटल्या आहेत.

पहिला चेंडू – चौकार

दुसरा चेंडू – चौकार

तिसरा चेंडू – षटकार

चौथा चेंडू – डॉट बॉल

पाचवा चेंडू – चौकार

सहावा चेंडू – १ धाव

15:10 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: इंडियन्स प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नेहल वढेरा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, पीयूष चावला, ल्यूक वुड, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

सबस्टीट्यूट: सूर्यकुमार यादव, नमन धीर, शम्स मुलानी, डेवाल्ड ब्रेविस, कुमार कार्तिकेय

15:09 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दिल्ली कॅपिटल्स प्लेईंग इलेव्हन

जेक फ्रेझर-मॅकगर्क, कुमार कुशाग्र, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, लिझाड विल्यम्स, मुकेश कुमार, खलील अहमद

सबस्टीट्यूट: रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, विकी ओसवाल, रिकी भुई,सुमित कुमार

15:07 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दोन्ही संघांमधील बदल

मुंबई इंडियन्सच्या संघात गेराल्ड कोएत्झीच्या जागी ल्युक वुडला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. तर दिल्लीच्या संघात पृथ्वी शॉऐवजी कुमार कुशाग्रला संधी देण्यात आली आहे.

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: आयपीएलमधील ४३ वा सामना मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. ज्यात दिल्लीने मुंबईवर १० धावांनी विजय मिळवला.