IPL 2024 Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights:

दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला. मुंबईच्या खेळाडूंची झुंज अपयशी ठरली, अखेरच्या षटकांत मुंबईच्या खेळाडूंनी मोठे फटके खेळले पण संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघ २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावाच करू शकला. मुंबईकडून तिलक वर्माने उत्कृष्ट खेळी खेळत ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. दिल्लीकडून रसिख आणि मुकेशने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर खलीलने २ मोठे विकेट घेतले.

दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात चांगली झाली पण पॉवरप्लेमध्येच संघाने ३ विकेट्स गमावल्या. रोहित शर्मा ८ धावा तर ईशान २० धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २६ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पंड्या २४ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला तर नेहल ४ धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने ४ चेंडूत सात धावा केल्या. तर तिलक वर्माने एका टोकाकडून आपली फलंदाजी सुरू ठेवली पण शेवटच्या षटकात धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत चार चौकार आणि ४ षटकार मारत ६३ धावा केल्या. पियुष चावलाने एक चौकार आणि षटकारासह १० तर वुडने ९ धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये दिल्लीने एकही विकेट न गमावता ९२ धावा केल्या. पियुष चावलाने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने फ्रेझरला बाद केले. फ्रेझर २७ चेंडूत ८४ धावांची स्फोटक खेळी खेळून बाद झाला. सलामीवीर अभिषेक पोरेल ३६ धावा, शाई होप ४१ धावा, कर्णधार ऋषभ पंत २९ धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स ४८ धावा करत नाबाद राहिला. मुंबई इंडियन्सकडून वुड, बुमराह, नबी आणि चावला यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली.

Live Updates

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights, IPL 2024: मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीच्या घरच्या मैदानावर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईच पराभव करत मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेतला.

15:04 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: नाणेफेक

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. दोन्ही संघांनी प्लेईंग इलेव्हन एक-एक मोठा बदल केला आहे. तर दिल्लीकडून लिझाड विलियम्सने पदार्पण केले आहे, इशांत शर्माने त्याला पदार्पणाची कॅप दिली.

14:55 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: मुंबईचा संघ नवव्या स्थानी

मुंबई इंडियन्स संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. मुंबईने आतापर्यंत ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत तर ५ सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुरूवातीचे ३ सामने गमावल्यानंतर दिल्लीला वानखेडेवर पराभूत करत पहिला विजय मिळवला पण विजयी लय कायम राखू शकला नाही. त्यामुळे गुणतालिकेत मुंबई ६ गुणांसह नवव्या स्थानी आहे.

14:49 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: पिच रिपोर्ट

दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियम यंदाच्या मोसमात फलंदाजीसाठी अनुकूल असणार आहे. यावर्षी या मैदानात २ सामने खेळवले गेले आहेत. ज्यात ७९.१ षटकांमध्ये तब्बल ९०९ धावा झाल्या आहेत.

14:29 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: इशांत आणि वॉर्नर मुंबईविरूद्धचा सामना खेळणार नाहीत.

डेव्हिड वॉर्नर आणि इशांत शर्मा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीत. दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या मागील सामन्यात दोन्ही खेळाडू प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हते. डेव्हिड वॉर्नरला या महिन्याच्या सुरुवातीला लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध अंगठ्याला दुखापत झाली होती, तर इशांत पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

14:27 (IST) 27 Apr 2024
DC vs MI: दिल्ली आणि मुंबईचे हेड-टू-हेड रेकॉर्ड

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्समध्ये एकूण ३४ सामने खेळवले गेले आहेत. या कालावधीत एमआयने १८ सामने आणि डीसीने १५ सामने जिंकले आहेत. तर अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीचा ६-५ च्या फरकाने आघाडीवर आहे.

Delhi Capitals vs Mumbai Indians Highlights: आयपीएलमधील ४३ वा सामना मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. ज्यात दिल्लीने मुंबईवर १० धावांनी विजय मिळवला.