IPL 2024, Rajasthan Royals vs Lucknow Super Giants: राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट त्याच्या घातक गोलंदाजीसाठी प्रसिध्द आहे. बोल्टने आयपीएलच्या पहिल्या सामन्यातील पहिल्याच षटकात विकेट घेतली. त्याने लखनऊ सुपर जायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला बाद केले. आयपीएल २०२२ आणि २०२३दरम्यान, बोल्टने डावाच्या पहिल्या षटकात २१ विकेट्स घेतल्या होत्या.पण दुसऱ्या षटकात बोल्ट आणखीनच धोकादायक गोलंदाजी करताना दिसला आणि देवदत्त पडिक्कल त्याच्या या घातक गोलंदाजीचा बळी ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या षटकात विकेट मिळाल्यानंतर ट्रेंट बोल्ट दुसऱ्या षटकात अधिक धोकादायक ठरला. पहिल्या चेंडूवर त्याने बाउन्सर टाकला. नुकतेच भारताकडून कसोटी पदार्पण करणारा देवदत्त पडिक्कल त्याच्या बाऊन्सरसाठी तयार नव्हता. चेंडू थेट त्याच्या हेल्मेटच्या ग्रिलवर लागला. यामुळे हेल्मेटच्या मागील बाजूचा भाग तुटून दूर पडला. चेंडू लागल्यानंतर पडिक्कल खूपच अस्वस्थ झाला. त्याला त्याचे हेल्मेटही बदलावे लागले.

बोल्टच्या बाऊन्सरनंतर पडिक्कल पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार झाला. बाऊन्सरनंतरचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाजाने तयार असले पाहिजे असं म्हटलं जातं, पण इथे पडिक्कलची थोडी चूक झाली. बाऊन्सरनंतर पुढच्या चेंडूवरही तो बॅकफूटवर गेला. बोल्टने चेंडू पुढे फेकला आणि पडिक्कल क्लीन बोल्ड झाला. पडिक्कलला त्याच्या ३ चेंडूंच्या खेळीत एकही धाव करता आली नाही. गेल्या मोसमात राजस्थानकडून खेळलेला देवदत्त हंगामापूर्वी लखनऊच्या संघात त्याला ट्रेड केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 devdutt padikkal hit on helmet by trent boult bouncer in rr vs lsg match watch video bdg