What if KKR vs SRH IPL 2024 Final Washed Out Due to Rain: बहुप्रतिक्षित असा आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज २६ मे रोजी श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील केकेआर आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्त्वाखालील सनरायझर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. अंतिम सामन्यापूर्वी शनिवारी चेन्नईमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे केकेआरला त्यांचे सराव सत्र रद्द करावे लागले. आता शेवटच्या दिवशीही पाऊस पडण्याची भीती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केकेआरचा संघ शनिवारी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत नेटमध्ये सराव करणार होते. सराव सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावला. तेव्हा केकेआरच्या खेळाडूंनी फुटबॉल खेळून वॉर्मअप सुरू केले होते. पावसामुळे केकेआरला त्यांचे सराव सत्र रद्द करावे लागले. तर ग्राऊंडस्टाफने सामन्यात वापरण्यात येणारी चौथी खेळपट्टी कव्हर्समुळे झाकण्यात आली. आता हा प्रश्न समोर आला आहे की अंतिम सामन्यात पाऊस पडला तर कोणता संघ आयपीएल २०२४ ची ट्रॉफी पटकावणार? आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस आहे की नाही?

गेल्यावर्षी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान देखील पाऊस पडला होता. मात्र, हा सामना राखीव दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी खेळवण्यात आला. आता या मोसमातही अंतिम सामन्यादिवशी पावसाने हजेरी लावल्यास हा सामना दुसऱ्या दिवशी खेळवला जाऊ शकतो, परंतु बीसीसीआयने राखीव दिवसाची अधिकृत घोषणा केलेली नाही. पावसाने सामना सुरू असताना मध्येच हजेरी लावली तर डिएलएस पध्दतीनेही विजेता घोषित केला जाऊ शकतो.

राखीव दिवशीही सामन्यात पाऊस पडल्यास किमान ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसे न झाल्यास पंच सुपर ओव्हर होण्याची प्रतिक्षा असेल. पण पावसामुळे अगदीच जर राखीव दिवशीही सामना खेळवण्याचे कोणतेही चिन्ह नसल्यास गुणतालिकेत सर्वाधिक गुण ज्या संघाला आहेत, त्याला विजेते घोषित केले जाईल. म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएल २०२४ चा विजेता ठरू शकतो.

Accuweather च्या अहवालानुसार, KKR vs SRH फायनलच्या दिवशी म्हणजे २६ मे रोजी पावसाचा अंदाज नाही. परंतु ढगाळ वातावरण आणि कमी आर्द्रता असण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील रामल चक्रीवादळामुळे किरकोळ पावसाचा धोका आहे, ज्याचा चेन्नईमध्ये संभाव्य परिणाम होऊ शकतो.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 final what if kkr vs srh match washed out due to rain on 26th may who will be the winner read details in marathi bdg