IPL 2024, Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरातच्या संघाने अखेरच्या षटकात मुंबई इंडियन्सवर ८ धावांनी शानदार विजय नोंदवला. ६ चेंडूत १९ धावांची मुंबईला गरज असताना उमेश यादवला गोलंदाजी सोपवण्यात आली. पहिल्या चेंडूवर पांड्याने षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. पण पुढच्या दोन चेंडूवर पांड्या आणि चावलाला बाद केल्याने गुजरात संघाने दणदणीत विजय नोंदवला. या पराभवासह मुंबई इंडियन्सने ११ वर्षांचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०१३ पासून आतापर्यंत कधीही पहिला सामना जिंकलेला नाही.

मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करताना मुंबईची सुरूवात विकेटने झाली. मुंबईनेही खातेही उघडले नव्हते आणि इशान किशन ओमरजाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने एकाच षटकात १९ धावांची लूट केली पण त्याच षटकात तो बाद झाला. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि रोहित शर्मा ने मुंबईचा डाव उचलून धरला आणि त्यांनी संघाची धावसंख्या १०० पार नेऊन पोचवली. रोहितने बाद होण्यापूर्वी २९ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. साई किशोरच्या गोलंदाजीवर पायचीत झाल्याने त्याचे अर्धशतक हुकले.

AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
How many hurdles in India way to host Olympics 2036
ऑलिम्पिक २०३६ आयोजनासाठी भारताच्या मार्गात किती अडथळे? सौदी, तुर्कीये, कतारचे आव्हान किती खडतर?

तर विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसचेही अर्धशतक हुकले. त्याने ३८ चेंडूत ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ४६ धावा करत मोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रोहित शर्माच्या विकेटनंतर मुंबईच्या धावांची गती मंदावली. गुजरातने भेदक गोलंदाजी करत मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला. तिलक वर्मा (२५), टीम डेव्हिड (११) मोठी धावसंख्या करू शकले नाहीत ज्याचा फटका संघाला बसला. हार्दिकने १ षटकार आणि १ चौकार लगावत संघाला विजयाच्या जवळ आणले पण बाद झाल्याने विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही.

गुजराजच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. ओमरजाई, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

तत्पूर्वी मुंबईच्या संघाने शानदार क्षेत्ररक्षण करत गुजरातच्या धावांवर आपला अंकुश ठेवला. पण मुंबईच्या गोलंदाजीची सुरूवात फारच खराब झाली. बुमराह संघात असतानाही मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने स्वत: पहिले षटक टाकले आणि त्याची साहाने चांगलीच धुलाई केली. त्याच्या दुसऱ्या षटकातही गुजरातच्या फलंदाजांनी त्याला चोप दिला. त्यानंतर बुमराहने साहाला १९ धावांवर क्लीन बोल्ड करत पहिली विकेट मिळवून दिली. गुजरातकडून गिलने ३१ धावा केल्या तर बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाल्याने साई सुदर्शनचे अर्धशतक हुकले. त्याने बाद होण्याआधी ३९ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह ४५ धावा केल्या. ओमरजाईने छोटी पण प्रभावी १७ धावांची खेळी केली.

मिलर बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने तोही मोठी खेळी करू शकला नाही. पण राहुल तेवतियाने १८व्या षटकात १९ धावा कुटत संघाला १६८ धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने बाद होण्यापूर्वी १५ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या.