Shubman Gill Arguing With Umpire Video Goes Viral : शुबमन गिलच्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२४ ची सुरुवात विजयाने केली. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात संघाला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. यानंतर पाचवा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला गेला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान असे काही घडले की, पंचांच्या निर्णयावर शुबमन नाराज दिसला. पंचांनी मोहित शर्माचा चेंडू वाईड घोषित केल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी दिलेल्या निर्णयानंतर मैदानावरीव पंचांवर संतापल्याचा दिसला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे झाला गोंधळ –

संजू सॅमसन मोहित शर्माचा उंचावरुन जाणारा चेंडू कट करायला गेला पण तो हुकला. तिसऱ्या पंचाने फलंदाज चेंडू जवळ आला की नाही हे तपासले. गिलने घेतलेल्या रिव्ह्यूवर याला फेअर डिलिव्हरी म्हटले गेले आणि पंचांनी आपला निर्णय बदलला. मात्र काही सेकंदांनंतर पुन्हा तपासण्यात आले आणि चेंडू वाईड देण्यात आला. यानंतर शुबमन गिलने मैदानावरील पंचांवर आपला राग काढला आणि तो खूप संतापलेला दिसत होता. शुबमन गिल नाखूष होता आणि त्याने मैदानावरील पंचांशी वाद घातला पण पंचांनी निर्णय बदलला नाही.

गुजरातची चांगली सुरुवात –

राजस्थानविरुद्ध गुजरातने शानदार सुरुवात केली. संघाने ५० धावांच्या आत दोन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र संजू सॅमसन आणि युवा रियान पराग यांनी गुजरात संघाला अडचणीत आणले. गुजरातच्या बाजूनेही अनेक वेळा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. गुजरात टायटन्सचे गोलंदाजी आक्रमण विकेट घेण्यासाठी संघर्ष करताना दिसले. गुजरातकडून उमेश यादव, राशिद खान आणि मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – RR vs GT : धनश्री वर्माने १५०वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलला दिल्या खास शुभेच्छा, VIDEO होतोय व्हायरल

राजस्थान रॉयल्सने केल्या १९६ धावा –

युवा फलंदाज रियान पराग अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने याआधी दोन अर्धशतके झळकावली असून या सामन्यातही परागने स्फोटक खेळी केली. दुसऱ्या टोकाकडून कर्णधार संजू सॅमसननेही आपली ताकद दाखवून दिली. परागने अवघ्या ४८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७८ धावांची शानदार खेळी केली. संजू सॅमसननेही ३८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. जलद खेळीमुळे राजस्थानने धावफलकावर १९६ धावा केल्या आणि गुजरातला १९७ धावांचे लक्ष्य दिले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 gt captain shubman gill arguing field umpire due to a decision by 3rd umpire against rr match video viral vbm