IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यात चेन्नईचा विस्फोटक फिनिशर धोनीने आश्चर्यकारक खेळी केली. धोनीने पंड्याच्या गोलंदाजीवर चेन्नईच्या डावातील अखेरच्या षटकात सलग तीन षटकार लगावले. ज्यामुळे १८० च्या जवळपास असलेली धावसंख्या थेट २०० पार गेली, ज्याचा मुंबईला मोठा फटका बसला. धोनीने लगावलेल्या या ३ षटकारांमुळे चेन्नईने २०७ धावा केल्या, तर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १८६ धावा करूच शकला. विस्फोटक फलंदाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीमुळे चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर चेन्नईच्या विजयाचे श्रेय हार्दिकने धोनीला दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

– quiz

सामन्यानंतर हार्दिक म्हणाला, “निश्चितपणे लक्ष्य गाठता आले असते, पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि पथिरानाने आमच्यापासून विजय हिरावून घेतला. चेन्नईने त्यांचे डावपेच हुशारीने वापरले. चेन्नईकडे स्टंप्सच्या मागे महेंद्रसिंग धोनी आहे. त्याच्या अनुभवाचा चेन्नईला फायदा झाला. या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी करावी हे तो गोलंदाजांना सातत्याने सांगत होता.”

सुपर किंग्जच्या २०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या. रोहित शर्माने ६३ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकारांसह नाबाद १०५ धावांची खेळी केली. रोहित शर्माने पहिल्या विकेटसाठी इशान किशन (२३) सोबत ७० धावांची आणि तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मासोबत ६० धावांची भागीदारी केली. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजीनंतर फलंदाजीतही फ्लॉप ठरला आणि केवळ २ धावा करत माघारी परतला. टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्डही चमकदार कामगिरी करू शकले नाहीत. तर चेन्नईकडून मथीशा पथिरानाने ४ षटकांत २८ धावा देत ४ विकेट्स घेतले, ज्याचा मुंबईला चांगलाच फटका बसला.

कर्णधार ऋतुराज गायकवाडची ६९ धावांची आणि शिवम दुबेच्या ६६ धावांच्या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. सुपर किंग्जने तीन विकेट गमावत चार विकेट्सवर २०६ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने चार चेंडूत तीन षटकारांसह २० धावांची नाबाद खेळी करत संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 hardik pandya gives credit to ms dhoni of chennai super kings win said theres a man behind the stumps who tells them whats working mi vs csk match bdg