: कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) वेगवान गोलंदाज हर्षित राणाला आयपीएल २०२४ मधील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. हर्षितला त्याच्या मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला. हैदराबाद आणि केकेआर यांच्यातील सामन्यात हर्षित राणाने शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत केकेआरला रोमहर्षक विजय मिळवून दिला. पण दुसरीकडे, हर्षित राणाने सामन्यादरम्यान एक मोठी चूक केली ज्याचा फटका त्याला बसला आहे.
हैदराबाद संघाचा खेळाडू मयंक अग्रवाल आणि हेनरिक क्लासेन यांना बाद केल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशनसाठी राणाला त्याच्या मॅच फीच्या ६० टक्को दंड ठोठावण्यात आला. आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.५ अंतर्गत लेव्हल-1 दोनदा उल्लंघन केले. या दोन चुकींसाठी त्याला दंड ठोठावण्यात आल्यानंतर यानंतर राणाने सामनाधिकारींचा निर्णय मान्य केला. अशा उल्लंघनांसाठी सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक मानला जातो.
मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात
कोलकाता संघाने हैदराबादला विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची चांगली सुरूवात झाली. सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा यांनी झटपट खेळी केल्या. यानंतर गोलंदाजीला आलेल्या हर्षित राणाने अग्रवालला झेलबाद केले. संघाला पहिली विकेट मिळवून देताच मयंक खूप उत्तेजित झाला आणि या विकेटचं सेलिब्रेशन त्याने मयंकला फ्लाईंग किस देत केलं. अनुभवी मयंकला त्याचा हा प्रकार आवडला नाही, त्याने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि काही न बोलता पॅव्हेलियनमध्ये गेला.
सामन्याच्या अखेरच्या षटकातही असाच काहीसा प्रकार घडला. हैदराबाद संघाला आपल्या वादळी फलंदाजीच्या जोरावर विजयाच्या जवळ आणणार क्लासेन अखेरच्या षटकात बाद झाला. मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतरही हर्षितने असंच काहीसे केले. या दोन्ही चुकांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली आहे.