धोनीने गुरूवारी सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर आपल्या टिपिकल स्टाईलमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापनाला, सहकाऱ्यांना आणि सपोर्ट स्टाफला धक्का दिला. धोनीने नाश्ता करत असतानाच आपण कर्णधारपद सोडत असल्याची बातमी दिली. त्यानंतर, धोनीने फ्रँचायझी व्यवस्थापनाशी संवाद साधत ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन याबद्दल माहिती देताना म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून या भूमिकेसाठी तो ऋतुराजला तयार करत होता.
– quiz
२०२२ मध्ये धोनीने कर्णधारपद सोडत जडेजाकडे नेतृत्त्वाची जबाबदारी दिली होती, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. “काही वर्षांपूर्वी धोनी कर्णधारपदी नसेल, याचा आम्ही कधी विचारच केला नव्हता. जेव्हा त्याने कर्णधारपद सोडायचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या निर्णयाने आम्हाला धक्का बसला होता.पण त्यानंतर आम्ही या धक्क्यातून सावरलो. एक नेतृत्त्व करणारा गट म्हणून आम्ही यातून काही गोष्ट शिकलो, प्रशिक्षकांची टीम आम्ही एकत्र बसलो काही निर्णय घेतले, तेव्हा ते सर्वच अतर्क्य वाटलं होतं, पण धोनी कधीतरी कर्णधारपद सोडेल याची आम्हाला जाणीव झाली. त्यामुळे तो कर्णधारपदी नसताना काय करायचं, कोण कर्णधार असेल, कसे डावपेच असतील यासंदर्भात आम्ही अभ्यास केला आणि जेणेकरून तेव्हा ज्या चुका झाल्या त्या होऊ नयेत म्हणून आम्ही पुरेशी तयारी केली, त्यामुळे आता हा धक्का जाणवत नाही.” असे फ्लेमिंगने धोनीच्या निर्णयाबद्दला सांगताना म्हटले.
ज्या संघात मोठे स्टार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले खेळाडू आहेत, ज्या संघाच्या व्यवस्थापनाची जाण असलेल्या गायकवाड यांच्याकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय योग्य आहे. एक अतिशय शांत व्यक्ती, तो ज्या प्रकारे अटीतटीच्या परिस्थितीशी सामना करतो ते वाखाणण्याजोग आहे. २७ वर्षीय युवा खेळाडू जो २०१९ च्या हंगामापूर्वी २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत फ्रँचायझीमध्ये सामील झाला आणि तेव्हापासूनच ड्रेसिंग रूममध्ये तसेच संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले. २०२२ मध्ये ऑरेंज कॅप जिंकल्यानंतर, मोठ्या लिलावापूर्वी, सीएसकेने ६ कोटी रुपयांना कायम ठेवलेल्या चार खेळाडूंपैकी गायकवाड एक होता. त्यामुळे तो सर्वात कमी मानधन असलेला कर्णधार आहे.
हेही वाचा: MS Dhoni: २३५ सामने, १० फायनल अन् पाच जेतेपद, धोनीच्या नावावर अद्भुत विक्रम
ऋतुराज धोनीचा उत्तराधिकारी
गायकवाड हा धोनीचा उत्तराधिकारी असेल याची पुरेपूर जाणीव त्याला होती, असे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पण खेळाडूच्या जवळच्या लोकांच्या म्हणण्यानुसार, ३ मार्चला प्री-सीझन कॅम्पमध्ये सामील होण्यासाठी तो पुण्याहून निघाला तेव्हाही, धोनीनंतर तोच कर्णधार म्हणून पुढील हंगामात पदभार स्वीकारेल अशी अपेक्षा होती. गायकवाड एक खेळाडू म्हणून खेळत होता तेव्हापासूनच धोनी त्याला या भूमिकेसाठी तयार करत होता, असे समजते.
“मुख्य प्रशिक्षकाशी बोलल्यानंतर धोनीनी सकाळी कर्णधाराच्या बैठकीपूर्वी आम्हाला निर्णयाची माहिती दिली,” विश्वनाथनने इंडियन एक्सप्रेसला सांगितले. “श्री एन श्रीनिवासन यांनी धोनीकडे जबाबदारी सोपवली आहे आणि तो जो काही निर्णय घेईल तो नेहमीच फ्रँचायझीच्या हिताचा असेल. गेली दोन-तीन वर्षे तो गायकवाडला मैदानात आणि मैदानाबाहेरही तयार करत आहे. धोनीला वाटले की त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्याची ही योग्य वेळ आहे कारण त्याला वाटतंय की गायकवाड देखील तयार आहेत,”असे विश्वनाथन म्हणाला.
फ्लेमिंगने धोनीच्या निर्णयाला सहमती दर्शवली. “गेल्या वर्षीच्या चांगल्या मोसमाचा विचार करता आणि भविष्याचा विचार करून हा धोनीचा निर्णय होता. वेळ योग्य होती. पडद्यामागे, ऋतु आणि इतर जण कर्णधारपदाच्या तयारीच्या प्रक्रियेत आहेत, अशा दिवसांची आणि येणाऱ्या संधींची वाट पाहत आहेत. परंतु एमएस हा सर्वोत्तम जाणकार आहे आणि त्याला वेळ योग्य असल्याचे वाटताच त्याने योग्य निर्णय़ घेतला,” तो म्हणाला.
जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय योजनेनुसार अपेक्षित परिणामांसह योग्य ठरला नाही. तेव्हापासून धोनीने गायकवाडला भावी कर्णधार म्हणून नियुक्त केले असल्याचे समजते. बेन स्टोक्सला पर्यायी पर्याय म्हणून आणले असले तरी, गायकवाड कधीतरी पदभार स्वीकारेल अशी फ्रेंचायझीला वाटत होते. विजय हजारे ट्रॉफीच्या २०२२-२३ दरम्यान, महाराष्ट्राने त्यांचे लीग सामने रांचीमध्ये खेळले होते, गायकवाड प्रत्येक संध्याकाळ धोनीच्या कंपनीत घालवत होता. त्या बैठकींमध्येच धोनीने गायकवाडला उत्तराधिकारी म्हणून फ्रँचायझी त्याच्याकडे कसे पाहत आहे याची माहिती दिली.
हेही वाचा: IPL च्या यशामुळे जगभरात सुरू झालेल्या ट्वेंटी-२० लीग तुम्हाला माहित आहेत का?
गायकवाडने त्या स्पर्धेचा उपयोग या भूमिकेसाठी स्वतःची चाचपणी घेण्यासाठी केला. “गेमप्लॅन्सपासून आमची सराव सत्रे ठरवण्यापर्यंत, आम्ही त्या वर्षी एक वेगळा ऋतु पाहिला. त्याने संघाची जबाबदारी घेतली. यापूर्वी किंवा नंतर कोणीही असे करताना आम्हाला पाहायला मिळणार नाही. यंदाच्या आयपीएलसाठी जेव्हा तो चेन्नईला रवाना झाला तेव्हा त्याला माहित होते की तो धोनीचा उत्तराधिकारी असेल, पण याच हंगामात त्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल असे कधीच वाटले नव्हते,” गायकवाडचा जवळचा मित्र आणि महाराष्ट्र संघातील सहकारी अजीम काझी म्हणाले.
एक आत्मविश्वासपूर्ण खेळाडू असण्याव्यतिरिक्त, फ्लेमिंग प्रत्येक हंगामात आयोजित केल्या जाणाऱ्या कर्णधार कौशल्य कार्यक्रमात व्यवस्थापनाने गायकवाडचे नेतृत्व गुण देखील चाचपले. गेल्या काही वर्षांपासून, फ्लेमिंग हा कार्यक्रम घेत आहेत, अनेक देशांतर्गत खेळाडूंनी अनिवार्य नसलेल्या या सत्रांना उपस्थित राहण्यासाठी स्वारस्य दाखवले. ही सत्रे, मैदानावरील रणनीतींबद्दल बोलण्याव्यतिरिक्त, संघ ज्या तत्त्वज्ञानाचे पालन करतात त्यांना लक्षात घेत संवाद आणि निर्णय घेण्याची कौशल्ये देखील विकसित करतात.