KKR vs RR match date likely to be changed : बीसीसीआयने आयपीएल २०२४ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक आधीच जाहीर केले होते. दुसऱ्या टप्प्यातील सामने भारताबाहेर होणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, नुकतेच दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करून बीसीसीआयने सर्व सामने भारतातच होणार असल्याचे स्पष्ट केले. पण आता १७ एप्रिलला होणाऱ्या सामन्याबाबत बीसीसीआय मोठा बदल करू शकते. १७ एप्रिल रोजी ईडन गार्डन्सवर केकेआर आणि आरआर यांच्यात सामना होणार आहे. पण क्रिकबझच्या बातमीनुसार, या सामन्याच्या स्थळ किंवा तारखेत बदल होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक, रामनवमीच्या दिवशी, कोलकातातील प्राधिकरण ईडन गार्डन्समध्ये कडेकोट सुरक्षा पुरवण्याबद्दल खूप चिंतेत आहे. या दिवशी संपूर्ण शहरात हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. इतकेच नाही तर बीसीसीआय लोकसभा निवडणुकीसंदर्भातही या सामन्याबाबत निर्णय घेऊ शकते. घरच्या मैदानामुळे केकेआर संघासाठी हा सामना सुवर्णसंधी ठरणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय स्थळाऐवजी तारीख बदलू शकते. वृत्तानुसार, राज्य संघटना आणि प्रसारकांना सामन्यातील बदलाबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे.

यंदाची हंगामात कोलकाता-राजस्थानची दमदार सुरुवात –

कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी आयपीएल २०२४ ची शानदार सुरुवात केली आहे. दोन्ही संघांनी सलग दोन विजयांसह मोसमाची सुरुवात केली. सध्या केकेआर संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर राजस्थान अव्वल ३ मध्ये कायम आहे. आता दोन्ही संघांची विजयी घोडदौड किती दिवस सुरू राहते हे पाहायचे आहे.

हेही वाचा – DC vs CSK : माहीने दिल्लीविरुद्ध दमदार फटकेबाजी करत लावली विक्रमांची रांग, पाहा संपूर्ण यादी

२६ मे रोजी होणार फायनल सामना –

लोकसभा निवडणुकीमुळे दुसऱ्या टप्प्यातील आयपीएलचे सामने भारताबाहेर होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल फायनलपर्यंतचे सर्व सामने भारतात होणार असल्याचे जाहीर झाले आहे. दुसऱ्या टप्प्याच्या वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२४ चा अंतिम सामना २६ मे रोजी होणार आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाणार आहे. गतवर्षी चेन्नई सुपर किंग्जने ५वे विजेतेपद पटकावले होते, यावेळीही संघाने दोन विजयांनी हंगामाची सुरुवात केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 kkr and rr upcoming clash which is scheduled to be played on april 17 likely to be rescheduled vbm