IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: कोलकाता संघाने सामन्याच्या अखेरच्या चेंडूवर ४ धावांनी हैदराबाद संघावर विजय मिळवला. डेथ ओव्हर्समध्ये संघाच्या हातून निसटलेला सामना हर्षित राणाने अखेरच्या षटकात केकेआरच्या दिशेने वळवला. कोलकाताने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ २०४ धावा करण्यात यशस्वी झाला. अखेरीस केकेआरच्या संघाने दणदणीत विजय मिळवला. आंद्रे रसेलच्या पहिल्या डावात षटकार-चौकारांच्या आतिषबाजीसह केलेल्या ६४ धावा आणि दुसऱ्या डावात २ विकेट्सही घेतले. पण हैदराबादच्या संघानेही काही हार नाही मानली. हेनरिक क्लासेनने डेथ ओव्हर्समध्ये षटकारांचा सिलसिला सुरू करत सामन्याचा रोख बदलला होता. पण कोलकाताला विजय मिळवण्यात यश आले. कोट्यवधी रूपये खर्चून संघात सामील केलेला मिचेल स्टार्क अयशस्वी ठरला पण हर्षित राणा कोलकातासाठी हुकुमाचा एक्का ठरला.

६ चेंडूत १३ धावांची गरज असताना हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली. शेवटचे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार खेचला. दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेत शाहबाजकडे स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर शाहबाज श्रेयस अय्यरकडून झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या यान्सनने एक धाव घेत क्लासेनला स्ट्राईक दिली. २ चेंडू ५ धावांची आवश्यकता असताना क्लासेनकडे स्ट्राईक होती त्याने चेंडू हवेत लगावला खरा पण सुयश शर्मा त्याचा झेल टिपला आणि त्याला तंबूत धाडले. यानंतर हर्षित राणाने सहाव्या चेंडूवर एकही धाव न दिल्याने कोलकाताने ४ धावांनी हा अटीतटीचा सामना जिंकला.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Amit Shah On Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी घेणार ‘हा’ निर्णय; अमित शाह यांचं मोठं आश्वासन

कोलकाताने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अभिषेक शर्मा(३२) आणि मयंक अग्रवाल (३२) यांना सलामीसाठी उतरले. या दोघांनीही संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण मोठी खेळी करू शकले नाहीत आणि हर्षित राणाच्या गोलंदाजीवर मयंक तर रसेलच्या गोलंदाजीवर अभिषेक बाद झाले. त्यानंतर राहुल त्रिपाठी (२०) आणि एडन मारक्रम (१८) यांनी बाद होण्यापू्र्वी धावांमध्ये योगदान दिले. त्यानंतर आलेला अब्दुल समद १५ धावा करत परतला. पण हेनरिक क्लासेनचे जणू तुफान आले होते. आंद्रे रसेलच्या ६३ धावांच्या तोडीस तोड खेळी करत त्याने हैदराबादला सामन्यात कायम ठेवले. हेनरिकने अखेरच्या षटकात बाद होण्यापू्र्वी २९ चेंडूत ८ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या. तर शाहबाज अहमदने ५ चेंडूत २ षटकार आणि एका चौकारांच्या मदतीने १६ धावा केल्या.

कोलकाताकडून हर्षित राणाने ३ षटाकांत ३३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क हे दोन्ही खेळाडू महागडे ठरले, त्यांनी ४ षटकांत अनुक्रमे ५५ आणि ५३ धावा दिल्या. पण वरूणला एक विकेट घेण्यात यश आले. केकेआरच्या संघातील आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्क हा पूर्णपणे अपयशी ठरला. तर सुनील नारायण १ आणि रसेलने २ विकेट्स मिळवल्या.

कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना७ बाद २०८ धावा केल्या होत्य. रमणदीप सिंग(३५), रिंकू सिंग(२३) आणि आंद्रे रसेल (६४) यांनी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. रसेलच्या बॅटमधून तर धावांचा पाऊस पडला आणि रिंकूसोबत ७व्या विकेटसाठी त्यांनी ८४ धावांची भागीदारी केली. हैदराबादकडून नटराजने ४ षटकांत ३२ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स मिळवल्या. तर मार्कंडेयने ३९ धावा देत २ विकेट्स मिळवल्या. नवा कर्णधार कमिन्सलाही १ विकेट घेण्यात यश आले.