IPL 2024 Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात केकेआरने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. मुंबईवरील विजयासह केकेआऱचा संघ आय़पीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरला आहे. पावसामुळे हा सामना १६-१६ षटकांचा करण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने १५७ धावा केल्या. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरने ४२ धावांची तर नितीश राणाने ३३ धावांची खेळी केली. मुंबईकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि पियुष चावला यांनी २-२ विकेट घेतले आहेत. मुंबई इंडियन्स संघ २० षटकांत केवळ १३९ धावा करू शकला.
मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४० धावा केल्या. तर तिलक वर्माने ३२ धावांचे योगदान दिले. याशिवाय इतर सर्व फलंदाज केकेआरच्या गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत. केकेआरकडून वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, हर्षित राणा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतले. तर सुनील नरेनने एक विकेट मिळवली.
Kolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Score, IPL 2024: मुंबई इंडियन्स वि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा केकेआरने बाजी मारत मुंबईचा १८ धावांनी पराभव केला.
केकेआरविरूद्धच्या सामन्यापूर्वी सराव करत असतानाचा रोहित शर्मा आणि तिलक वर्माचा मुंबई इंडियन्सने एक व्हीडिओ शेअर केला आहे.
‘काय हिरो, गार्डनमध्ये आला आहे का?’ तिलक वर्माचं उत्तर ऐकून रोहित शर्माच झाला चकित, VIDEO व्हायरल
ईडन गार्डन्सवर सध्याचा हंगाम उच्च धावसंख्येच्या नावे राहिला आहे. पंजाब किंग्सने या मैदानावर टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता. राजस्थान रॉयल्सनेही २२४ धावांचे आव्हान ठेवले होते. केकेआरने दिलेले २२३ धावांचे लक्ष्य आरसीबीने केवळ १ धावाने गमावले. अशा स्थितीत आजही धावांचा पाऊस पाहायला मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी निवडण्याला प्राधान्य देतात.
Tonight we play for our ?????, our #KnightsArmy! ? pic.twitter.com/TpHU4Q5lRk
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 11, 2024
यंदाच्या आयपीएल हंगामातील उभय संघांमधील हा दुसरा सामना असणार आहे. जेव्हा पहिल्यांदा MI आणि KKR आमनेसामने आले होते, तेव्हा कोलकाताने मुंबईचा २४ धावांनी पराभव केला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात आला होता आणि येथील विजयासह २०१२ नंतर केकेआरने पहिल्यांदाच मुंबईचा त्यांच्या घरच्या मैदानावर पराभव केला होता.
आयपीएलमध्ये कोलकाता आणि मुंबई यांच्यात एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी २३ सामने जिंकून एमआयने वर्चस्व राखले आहे. तर केकेआरला यापैकी १० सामन्यात विजय मिळाले आहेत.