IPL 2024, KKR Vs SRH Playing Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि सनरायझर्स (एसआरच) यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. गेल्या वर्षी दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले होते आणि दोघांनी एकदाच विजय मिळवला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे दोन सर्वोत्तम खेळाडू आणि आयपीएल इतिहासातील दोन सर्वात महागडे खेळाडू आमनेसामने येणार आहेत. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर असून पॅट कमिन्सकडे एसआरएचचे नेतृत्व आहे. या सामन्याची संभाव्य प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टीचा अहवाल जाणून घेऊया.

खेळपट्टीचा अहवाल –

त्याचबरोबर या सामन्यात पॅट कमिन्स (२०.५० कोटी) आणि मिचेल स्टार्क (२४.७५ कोटी) या दोन आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. दोन्ही संघांतील सामना ईडन गार्डन्सवर होणार असून हा सामना उच्च-स्कोअरिंग होऊ शकतो. ईडन गार्डन्सवर कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. यावेळीही परिस्थिती काही वेगळी नसेल. या सामन्यात खूप धावा केल्या जाऊ शकतात, पण गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजीचा दबदबा दिसून येतो. केकेआरकडे सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या रूपाने तीन उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. या सामन्यात १८० किंवा त्याहून अधिक धावा होण्याची शक्यता आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IPL 2025 Mega Auction Jofra and Archer Cameron Green not shortlisted
IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
IPL 2025 player auction list announced 574 cricketers set to feature with 204 slots available See Full List in Marathi
IPL 2025 Players Auction List: आयपीएल २०२५ च्या लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर, २०४ जागांसाठी ५०० हून अधिक खेळाडूंवर लागणार बोली
Tim Southee Retirement From Test Cricket After 3 match Home Series Against England Said its tough decision but it is the right one
रोहित-सेहवागपेक्षा सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ‘हा’ कसोटी सामना अखेरचा
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी

हैदराबाद आणि कोलकात्याची आकडेवारी –

आयपीएलच्या इतिहासात, केकेआर आणि एसआरएच आजपर्यंत २५ वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने १६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादने ९ सामन्यात विजय मिळवला आहे. खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप चांगली आहे असे म्हणता येईल आणि या बाबतीत दोन्ही संघ समान पातळीवर असल्याचे दिसून येत आहेत.

हेही वाचा – Team India : ‘बीसीसीआयने कर्णधारपदाची ऑफर दिली होती पण धोनी…’, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य

केकेआरकडे रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर, नितीश राणा आणि रिंकू सिंग आहेत, पण त्यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. दुसरीकडे, एसआरएचकडे ट्रॅव्हिस हेड, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन यांच्या रूपाने जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत, परंतु गेल्या हंगामाप्रमाणे एका फलंदाजाला जबाबदारी स्वीकारावी लागेल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजाचे वर्चस्व पाहायला मिळू शकते, ज्यामध्ये केकेआर संघ वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.

हेही वाचा – CSK vs RCB : सामन्यादरम्यान कोहलीने पुन्हा उत्साहात गमावले भान, रचिन बाद झाल्यावर अशी दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, पॅट कमिन्स (कर्णधार), शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.