IPL 2024, Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: आयपीएल २०२४ च्या ३४ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनौने सीएसकेवर ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. १५४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना राहुलने ५३ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे राहुलला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. पण यासह केएलने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केएल राहुलने ३१ चेंडूत ५३ धावा करत अर्धशतक झळकावले. विकेटकीपर-फलंदाज केएल राहुलचा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील हा २५व्यांदा ५० अधिक धावांची वैयक्तिक धावसंख्या केली. यासह त्याने आता दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनीच्या नावे असलेला विक्रम मोडला आहे.

चेन्नईच्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने क्विंटन डी कॉक (५४) सोबत पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी करून चेन्नईवर चांगलाच दबाव आणला. या स्फोटक खेळीनंतर राहुल आता IPL मध्ये २५ वेळेस ५० पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे. राहुलने आता आयपीएलमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून एमएस धोनीने केलेल्या २४ अर्धशतकांचा आकडा मागे टाकला आहे.

सीएसकेविरुद्धचा सामना हा राहुलचा आयपीएलमधील १२५वा सामना होता. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. त्या ६८ सामन्यांमध्ये राहुलने आतापर्यंत २५ वेळा ५० अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. या यादीत डी कॉक (२३) तिसऱ्या स्थानावर, दिनेश कार्तिक (२३) चौथ्या स्थानावर आणि रॉबिन उथप्पा (१८) पाचव्या स्थानावर आहे.

केएल राहुलला त्याच्या ८२ धावांच्या स्फोटक खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळेस सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला. कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळेस सामनावीर ठरणारा राहुल हा पाचवा खेळाडू ठरला आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 kl rahul broke ms dhoni all time record of most 50 plus score as wicketkeeper batsman lsg vs csk bdg
Show comments