IPL 2024 Mumbai Indians Captains: आयपीएल मधील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन संघाची ओळख आहे. आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हा पहिला संघ आहे ज्या संघाने या टूर्नामेंटच्या पाच ट्रॉफी जिंकल्या. मुंबईनंतर आयपीएलच्या या पाच ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्स च्या नावावर आहे. सध्या मुंबई इंडियन्सला मोठ्या ट्रॉलिंगला सामोरे जावे लागत आहे. 2013 पासून मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली. अनेक चाहत्यांना हा निर्णय पटलेला नसल्यामुळे मुंबई इंडियन्सला सध्या मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या आयपीएल मधील पहिले दोन्ही सामने मुंबई संघाने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्या चाहत्यांचा चांगलाच निशाण्यावर आला आहे.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात २००८ पासूनच एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडू होते. भारतीय असो व विदेशी खेळाडू अनेकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम राखला होता. आतापर्यंत मुंबई इंडियन्स सेकंड कोणत्या कारणा धरून गेले आणि त्यांच्या कर्णधार पदाचा कारकिर्दीतील रेकॉर्ड याचा आपण आढावा घेऊया.

२००८ ते २०२३ या काळात मुंबईचे कर्णधार कोण होते?

सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, शॉन पोलॉक, रिकी पॉइंटिंग कीरॉन पोलार्ड, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सचे काही कर्णधार होऊन गेले. पण यापैकी कोणत्याच कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद पटकावता आले नव्हते. संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार हा रोहित शर्मा ठरला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच जेतेपद पटकावून विक्रमही आपल्या नावे केला.

२००८ मध्ये सचिन तेंडुलकरला संघाचे कर्णधार पद देण्यात आले होते. पण सचिन तेंडुलकरला त्या हंगामापूर्वी दुखापत झाल्याने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये हरभजन सिंग कडे संघाचे नेतृत्व होते. सचिनच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या हरभजन सिंग ने चालू सामन्यात यश श्रीशांतच्या कानशिलात लगावल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली. २००८ ते २०१२ या कालावधीत हरभजन सिंग कडे मुंबई संघाचे नेतृत्व होते आणि या काळात त्याच्या कर्णधार पदाखाली मुंबईने ३० सामने खेळले त्यापैकी १४ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवण्यात यश मिळाले तर १४ सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला.

हरभजन सिंग वर बंदी घातल्यानंतर शॉन पोलॉक याला मुंबई इंडियन संघाचे कर्णधार पद देण्यात आले. सचिन तेंडुलकर दुखापतीतून सावरेपर्यंत मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वाची जबाबदारी ही पोलॉकच्या खांद्यावर होती. पोलॉकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ चार सामने खेळला या चार पैकी तीन सामने मुंबईने जिंकले तर एका सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला.

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने ५५सामने खेळले, यापैकी ३२ सामन्यांमध्ये एमआयला विजय मिळवता आला तर २३ सामन्यांमध्ये संघाचा पराभव झाला. तरी याशिवाय २०१० मध्ये डवेन ब्रावोच्या खांद्यावर एका सामन्यात संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळाली पण या एका सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

२०१३ मध्ये सचिन तेंडुलकरने आयपीएल मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच २०१३ च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन संघाने रिकी पॉइंटिंगला खरेदी केले आणि त्याला संघाचा कर्णधार घोषित केले. पण कर्णधार असलेल्या पॉन्टिंग आपल्या नेहमीच्या बेधडक फॉर्ममध्ये नव्हता. त्यामुळे पॉन्टिंगने स्वतःहून कर्णधार पद सोडत बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आयपीएल मध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये एका वेळी फक्त चार विदेशी खेळाडू खेळू शकतात. पॉन्टिंग हा संघाचा कर्णधार असल्याने तो संघात खेळणारच होता, पण त्याचा फॉर्म नसल्याने एक स्लॉट मात्र अडून राहत होता. त्या व्यतिरिक्त संघात ड्वेन स्मिथ, लसिथ मलिंगा, पोलार्ड, मिचेल जॉन्सन असे बरेचसे एका पेक्षा एक खेळाडू होते. त्यामुळे पॉन्टिंग स्वतः बाजूला झाल्याने एक स्लॉट रिकामी झाला आणि त्याच्या जागी मिचेल जॉन्सन संघात खेळू लागला.

रोहित शर्मा

रिकी पॉन्टिंग नंतर २०१३मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित शर्मा कडे देण्यात आले. २०१३ ते २०२३ या कालावधीत रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद भूषवले. या काळात त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 163 सामने खेळले असून त्यापैकी ९१ सामने हे संघाने जिंकले आहेत तर ६८ सामन्यांमध्ये संघाला पराभव करावा लागला. यासोबतच चार सामने अनिर्णित राहिले. रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० च्या आयपीएल हंगामाचे जेतेपद पटकावले.

संघाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने ही २०१४ ते २०२१ या काळात काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्याच्या नेतृत्वाखाली संघाने नऊ सामने खेळले असून त्यातील पाच सामन्यात विजय तर चार सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला. तर २०२३ मध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला एका सामन्याचे कर्णधार पद भूषवण्याची जबाबदारी मिळाली आणि ही जबाबदारी त्यांनी चोख पार पाडत त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजय मिळवला.

२०१३ ते २०२३ म्हणजेच एक दशक मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्मा च्या जागी २०२४ च्या आयपीएल हंगामाचे कर्णधार पद हार्दिक पंड्याला देण्यात आले आहे. मुंबईचे यंदाच्या आयपीएल मधील आत्तापर्यंत दोन सामने झाले आहेत या दोन्ही सामन्यात संघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्याच सामन्यात शुभमंगल च्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विक्रमी २७६ धावांची खेळी करत मुंबई इंडियन्सला ३१ धावांनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १ एप्रिलला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडेमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. आता हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Story img Loader