CSK vs RCB Live Streaming, IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगचा १७ वा सीझन म्हणजेच आयपीएल २०२४ उद्या २२ मार्चपासून सुरू होत आहे. यंदा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या घरच्या मैदानावर होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनी पाहायला मिळणार आहे. या सेरेमनीला अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत. पण सीएसके आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना लाइव्ह कुठे पाहायला मिळणार आहे, जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– quiz

चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना कुठे खेळवला जाणार?

  • एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

CSK vs RCB यांच्यातील पहिला सामना किती वाजता सुरू होणार

  • सामना ८ वाजता सुरू होईल तर सामन्याची नाणेफेक ७.३० वाजता होईल.

आयपीएलचा पहिला सामना चेन्नई विरूध्द बंगळुरू यांच्यातील पहिला सामना कुठल्या ओटीटी अ‍ॅपवर पाहायला मिळेल

  • जिओ सिनेमा

चेन्नई सुपर किंग्ज वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील पहिला सामना भारतात कोणत्या स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल?

  • स्टार स्पोर्ट्स १ (इंग्रजी), स्टार स्पोर्ट्स १ (हिंदी), स्टार स्पोर्ट्स १ (कन्नड), स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टार स्पोर्ट्स १ तमिळ, प्रवाह पिक्चर मराठी

हेही वाचा: IPL च्या यशामुळे जगभरात सुरू झालेल्या ट्वेंटी-२० लीग तुम्हाला माहित आहेत का?

भारतात आयपीएल २०२४ चे सामने जिओ सिनेमा अ‍ॅप आणि वरील नमूद केलेल्या स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाइव्ह पाहायला मिळणार आहेत. तर जगभरात कोणकोणत्या चॅनेलवर आयपीएलचे सामने लाइव्ह पाहता येणार आहेत, इथे जाणून घ्या.
यूएसए – क्रिकबझ ॲप, विलो टीव्ही
कॅनडा – क्रिकबझ ॲप, विलो टीव्ही
युनायटेड किंगडम – DAZN, स्काय स्पोर्ट्स
ऑस्ट्रेलिया – फॉक्स स्पोर्ट्स
न्यूझीलंड – स्काय स्पोर्ट एनझेड
दक्षिण आफ्रिका – सुपरस्पोर्ट
पाकिस्तान – युप टीव्ही
कॅरिबियन – फ्लो स्पोर्ट्स
बांगलादेश – गाझी टीव्ही
अफगाणिस्तान – एरियाना टेलिव्हिजन नेटवर्क
नेपाळ – स्टार स्पोर्ट्स, युप टीव्ही
श्रीलंका – स्टार स्पोर्ट्स, युप्प टीव्ही
मालदीव – स्टार स्पोर्ट्स, युप्प टीव्ही
सिंगापूर – स्टारहब
गयाना – इ-नेट

भारतासह ३७ देशांमध्ये आयपीएलचं थेट प्रक्षेपण होणार आहे. वरील नमुद केलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये क्रिकबझ ॲपवर पाहायला मिळणार आहेत.