IPL 2024 LSG VS CSK Match Noise Levels Peak : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतेय. धोनी जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा तेव्हा चाहते ‘धोनी धोनी’ अशी नारेबाजी करीत एकच जल्लोष करतात. यावेळी स्टेडियममधील माहोल अगदी पाहण्यासारखा असतो. १९ एप्रिलच्या रात्री आयपीएल २०२४ मधील ३४ वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात लखनौमधील इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. त्यावेळी धोनी फलंदाजीसाठी ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाच्या जल्लोष करू लागले. धोनीच्या एन्ट्रीवेळी स्टेडियममध्ये एवढा आवाज झाला, की स्मार्ट वॉचवरही अलर्टचे मेसेज येऊ लागले. त्या मेसेजद्वारे एवढे ध्वनिप्रदूषण स्टेडियममधील प्रेक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे सूचित केले गेले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा