GT vs LSG Match Highlights : आयपीएलच्या १७व्या हंगामातील २१वा सामना लखनऊ येथे पार पडला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले होते, ज्यामध्ये लखनऊने गुजरातवर ३३ धावांनी विजय मिळवला. या विजयात विदर्भवीर यश ठाकुरने पाच विकेट्स मोलाचे योगदान दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊने गुजरातसमोर १६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, प्रत्युतरात गुजरात टायटन्सचा संघ १८.५ षटकांत १३० धावांवर गारद झाला. अशा प्रकारे लखनऊने पहिल्यांदाच गुजरातवर विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक साधली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनऊ सुपर जायंट्सच्या १६३ धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली. गुजरात टायटन्सचे सलामीवीर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ५४ धावा जोडल्या. शुबमन गिलने १९ धावा केल्या. साई सुदर्शनने ३१ धावांचे योगदान दिले, मात्र त्यानंतर नियमित अंतराने विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. काही वेळातच गुजरात टायटन्सचे ५ फलंदाज ८० धावांपर्यंत पोहोचल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतले. केन विल्यमसन, शरथ बीआर, विजय शंकर आणि दर्शन नळकांडे स्वस्तात बाद झाले.

क्रुणाल पंड्या आणि यश ठाकूरची शानदार गोलंदाजी –

लखनऊ सुपर जायंट्ससाठी महाराष्ट्रातील विदर्भवी यश ठाकूर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. यश ठाकूरने ३.५ षटकांत ३० धावांत ५ फलंदाज बाद केले. क्रुणाल पंड्याने गुजरात टायटन्सच्या 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर रवी बिष्णोईला एक विकेट घेतली. यश मिळाले. अशा प्रकारे लखनऊ सुपरजायंट्सने गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव करून सलग तिसरा विजय नोंदवला. आयपीएलमध्ये लखनऊचा गुजरातवरील हा पहिला विजय आहे. त्याचबरोबर लखऊने चार सामन्यात ६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

हेही वाचा – GT vs LSG : डीआरएसवरून झाला वाद, शुबमनसह गुजरात टायटन्सचे खेळाडू भिडले अंपायरशी, VIDEO होतोय व्हायरल

तत्पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ५ गडी गमावून १६३ धावा केल्या. लखनऊसाठी अष्टपैलू फलंदाज मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक धावांचे योगदान दिले, त्याने ४३ चेंडूत ५८ धावा केल्या. या खेळीत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. दुसरीकडे कर्णधार केएल राहुलने ३१ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. आयुष बडोनीने ११ चेंडूत २० धावा केल्या, मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही.

हेही वाचा – IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका

१५ षटकांनंतर लखनऊची धावसंख्या ४ बाद ११४ धावा होती, मात्र निकोलस पुरणने २२ चेंडूत ३२ धावांची खेळी करत लखनऊला १६३ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. स्पेन्सर जॉन्सनच्या शेवटच्या षटकात एक षटकार आला, पण संपूर्ण षटकात त्याने केवळ ८ धावा देऊन एलएसजीला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. शेवटच्या ५ षटकांमध्ये लखनऊच्या फलंदाजांनी ४९ धावा जोडल्या आणि एलएसजीला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 lsg vs gt match lucknow supergiants defeated gujarat titans by 33 runs vbm