मुंबई : लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासमोर आज, शुक्रवारी ‘आयपीएल’च्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. मुंबईच्या संघाला गेले चार सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावे लागले आणि यापैकी तीनमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आता घरच्या मैदानावर परतताना कोलकाताविरुद्ध विजय मिळवून ‘प्ले-ऑफ’च्या धुसर आशा कायम राखण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> SRH vs RR : भुवीची कमाल; राजस्थानचा झंझावात रोखला; रोमांचक सामन्यात एका धावेने विजय

मुंबई आणि कोलकाता हे संघ ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत सध्या विरुद्ध दिशेला आहे. नऊ सामन्यांत सहा विजय मिळवत १२ गुणांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबईवर विजय मिळवण्यात यश आल्यास कोलकाताचा ‘प्ले-ऑफ’मधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. दुसरीकडे, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला १० पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहे. त्यामुळे अवघ्या सहा गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानावर आहे. चार साखळी सामने शिल्लक असताना मुंबईचा ‘प्ले-ऑफ’ प्रवेश अवघड दिसत असला, तरी आपण आशा सोडलेली नसल्याचे कर्णधार हार्दिकने स्पष्ट केले आहे.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप

Story img Loader